रविवार, २४ सप्टेंबर, २०१७

व्यक्तित्व



कोपरा

कोपरा...

एकांताचा
एकुलता एक
भन्नाट
कोपरा असावा,
पसरावे कधी
ऐसपैस पसाऱ्याने
निवांत एकट्याने
हलू नये...चुकूनही
चुकत नाहीत
माणसे जोवर...
रहावे स्थितप्रज्ञ
वटवृक्षा सारखे...

© शिवाजी सांगळे 🦋
१९-०९-२०१७

गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७

शब्द

शब्द

शब्द श्वास
शब्द आस
शब्द ध्यास
शब्द प्यास
शब्द विश्वास
शब्द अभ्यास
जपावा शब्द श्वास
ठेवावा शब्द ध्यास
पाळावा शब्द खास
करावा शब्द अभ्यास
टिकावा शब्द विश्वास
अर्थात
शब्द शास्त्र,
शब्द शस्त्र,
शब्द अस्त्र,
शब्द मैत्र.... असावे सर्वत्र
#शिव

मंगळवार, १२ सप्टेंबर, २०१७

हायकू १६९-१७१

#हायकू १७१


#हायकू १७०


#हायकू १६९
गेला पाऊस
कवडसा रेंगाळे
अंगणी माझ्या ०८-०९-२०१७

सोमवार, ११ सप्टेंबर, २०१७

मला वाटते...जाहिराती आणि जबाबदारी

जाहिराती आणि जबाबदारी

पुर्वी म्हणत चार वेद, सहा शास्त्रे, चौदा विद्या, अठरा पुराणे आणि चौसष्ट कला प्रत्येकाला माहित असायला पाहिजेत. बाकी वेद, विद्या, पुराणे यात काही बदल झाला नाही पण नंतरच्या काळात चौसष्ट कलांमधे पासष्टाव्या एका कलेचा भर पडली, ती म्हणजे जाहिरात.

हल्ली टीव्ही वर कोणत्याही चँनलवर सफर करा, तुम्हाला बातम्या, कार्यक्रम कमी व जाहिरातीच जास्त दिसतील. दाखवा बापडे, त्यामुळेच तर चँनल वाल्यांची दुकाने सुरू आहेत. परंतु कधी कधी या जाहिराती पाहताना त्या जाहिराती तयार करणाऱ्या कंपन्यांच्या कल्पकतेची किव येते.

एका साबणाच्या जाहिरातीत "तुझा रंग एवढा उजळ कसा" हा बिनडोक प्रश्न तो नवरा आपल्या बायकोला विचारतो (अरे, ए सी मधे रंग उजळच रहातो, तुझा साबणाने जर शेतात राबणाऱ्यांना कष्टकऱ्यांना उजळ करून दाखवलं तर आयुष्यभर तुझाच साबण वापरेल मी) पुढे अरे वा, मस्तच" काय अर्थ समजतो या वाक्यातून?

अशीच आणखी एक जाहिरात, तज्ञ डॉक्टर सांगतात "लहान मुलांजवळ कोणत्याही प्रकारची मच्छर मँट, रिपेलन्ट लावु नये, त्यातील केमिकल मुळे मुलांना श्वास घ्यायला त्रास होतो", तरीसुद्धा त्या उत्पादनांची जाहिरात होते, बरं त्यात जी इतर लहान मुलं आहेत त्यांच्या तोंडचे संवाद सुद्धा उद्धटपणाचे आहेत, काय संदेश जातो यातून?

हि केवळ काही उदाहरणे आहेत, अशा भरपूर अर्थहिन जाहिराती अशा भरपूर अर्थहिन जाहिराती दाखवल्या जातात..

हे झालं जाहिरात कंपनीच्या कल्पते बद्ल, पुढील काही उदाहरणं जाहिरातीत काम करणाऱ्या कलाकारां संबधी एका फेस क्रिमच्या जाहिरातीत शाहरूख खान दुसऱ्या एका क्रिमचा खोका, पँकिंग समोरच्या कलाकारा कडून घेऊन इतस्ततः फेकून देतो, अन्य एका तेलाच्या जाहिराती साक्षी तन्वर मुलीच्या केसात अडकलेली काडी काढून पाठीमागे फेकते, तसेच एका सँनेटरी नँपकीनच्या जाहिरातीत असाच प्रकार. जाहिरातीच्या दिग्दर्शकाला स्वच्छतेचं भान नाही का? यातुन त्यांची बेफिकीर वृत्ती मात्र दिसते.

सतत मारा होणाऱ्या या जाहिरातीतुन समाजाला सकारात्मक संदेश मिळावा अशी अपेक्षा आहे, परंतु तसं होत नाही, उलट यांचा बालिशपणा समोर येतो, यातील मान्यवर कलाकार सुद्धा केवळ स्वतःला मिळणाऱ्या पैशाचाच विचार करताना हे विसरून जातात कि अनेक लोक त्यांच अनुकरण करतात, त्यांनी अशा वेळी स्वतःच्या प्रसिद्धीचे भान ठेवून योग्य बदल सुचवून काम करायला हवं, पण दुर्दैवाने तसं होत नाही, एवढं मात्र खरं.

#मला वाटते...शिवाजी सांगळे© ११-०७-२०१७

शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०१७

हायकू १६६-१६८

#हायकू १६८
सावळ मेघ
गोंधळलेला वारा
खिन्न का मन ०७-०९-२०१७

#हायकू १६७
स्तब्ध आरास
रिता झाला मखर
स्मृती बाप्पाच्या ०६-०९-२०१७

#हायकू १६६
हले मुक्काम
आज बारा दिसांचा
ना मनातला ०५-०९-२०१७

धोका देवू लागले



काँकटेल



शनिवार, २ सप्टेंबर, २०१७

पण काहीही म्हणा...हिरो बाबा



पण काहीही म्हणा...एका तपाची गोष्ट



स्त्री...

स्त्री...

वास्तव आहे...
नकळत/कळत
परंपरेत, दहशतीत
अडकली आहे...
शतके, युगे लोटली
परंपरा तशीच आहे...
पुढारलो/सुधारलो
तरी नाही बदललो,
स्वातंत्र्य/मुक्तीच्या
तीच्या...
समान हक्काच्या
गप्पा खूप झाल्या
सर्वांच्या...
तरीही अजुन
स्त्री...
तशीच
नात्यांच्या
बंदीवासात आहे!

© शिवाजी सांगळे 🦋
http://marathikavita.co.in/gambhir-kavita/t29412/new/#new

हा छंद केला



शुक्रवार, १ सप्टेंबर, २०१७

हायकू १६०-१६२

#हायकू १६२

आवरेच ना
धावते ते सर्वत्र
चंचल मन ०१-०९-२०१७

#हायकू १६१



#हायकू १६०