चारोळ्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चारोळ्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ३१ जुलै, २०२१

तुज आठवांचे

 तुज आठवांचे

क्षणात स्फुरते क्षणात स्मरते

तुज आठवांचे मग गाणे होते


मनी घोळता उमाळे तुज स्मृतींचे

ओसंडूनी येती भाव मज मनीचे

विस्मरावे कसे कळेना गुज प्रेमाचे

वेळी अवेळी मन उगा बावरते

हलकेच हळूवार नेत्र पाणवते...१

तुज आठवांचे...


आयुष्याचे सगळे हिशोब फसले 

रस्तेच आपले जेव्हा विलग झाले

सारेच अवघड आता जगणे आले

सावरावे तोवर मन पुन्हा गुंतते

सांग तुलाही का हे कोडे पडते...२

तुज आठवांचे...


दिल्या घेतल्या त्या सऱ्या वचनांचे

रेखाटले चित्र मी भेटल्या स्थळांचे

मलाच उरे ना त्यात भान स्वतःचे

भावनांचे कुठवर हे खोडावे नाते

उचंबळून येता मन चिंबचिंब होते...३

तुज आठवांचे...

https://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/t33499/new/#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon

 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, २३ जुलै, २०२१

काहूर गाणी

 काहूर गाणी

ओलेत्या पायवाटेवरती

ओल्या साऱ्या आठवणी

क्षण सर्व निसटूनी गेले

वळणावर धूसर कहाणी


हळूवार नात्यांची असते

अलवार रेशीम कहाणी

सैलावता तो तलम बंध

तेव्हा दाटते काहूर मनी


ह्रदयी दाटता गत स्मृती

स्वप्नेही गातात प्रेम गाणी

बंधनात पुन्हा नात्यांच्या

फुलू पाहते नवी कहाणी

https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t33463/new/#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon

 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, १० नोव्हेंबर, २०२०

सोमवार, ९ नोव्हेंबर, २०२०

भास

 शब्दाचा मग गोड भास

मिटल्या नेत्री अवतरतो

हवाहवासा चेहरा तुझा

शब्दा मधे गुंफून जातो

~शिव ७१६|०८११२०२०

रविवार, १८ ऑक्टोबर, २०२०

उदास

काळोख दाटल्या अंधार दिशा

झाकोळला चंद्रही त्या अंगणी

घेऊन कुणाच्या रम्य आठवणी

एकटा उदास का 'तारा' गगनी

~शिव ७१२|१६१०२०२०