लाटेचे विरहगीत
ओझरता काय होतो किनाऱ्यास स्पर्श लाटेचा
माघारी जाता म्हणते हा योग आपल्या भेटीचा
मलाही वाटते खुपदा थांबावे तुझ्या सोबतीला
तटस्थ ठाम तु,तोडू कसा नियम हा प्राक्तनाचा
अनिर्बंध धावते मी, खळाळून आशेने भेटीच्या
भेटता क्षणीच, जीव होतो पाणी पाणी मनाचा
सारेच येथले अनाकलनीय काही कळत नाही
परिस्थितीत साऱ्या कुणी दोष कुणास द्यायचा
तरी बरं,सोबती तुझ्या असतात बरीच जोडपी
ठरवते पाहून त्यांना,विरह आपला विसरायचा
अनोखा संसार मांडला नियतीने जगी आपला
कळेना टाळायचा कसा अटळ भोग जीवनाचा
https://marathikavita.co.in/index.php?topic=66530.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९


