मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२६

क्यों ना कहूँ,

क्यों ना कहूँ,

आवाज मत देना मुझे, आज के बाद
चाहे तो चलूँगा अकेले, आज के बाद

जो उम्मीदें लगाई थी मैंने हमारे लिए
शायद ध्वस्त होगी सब,आज के बाद

जानता हूं, दौर मुसिबतों का आता हैं
नाराज हूं, और सोचूंगा आज के बाद

सवाँर था भूत,कि कुछ कर गुजार दूँ
हौसला तोड दिया तुने, आज के बाद

देखकर भी अधूरे रहें,ख्वाब ऐ ज़िंदगी
क्यों ना कहूँ अलविदा, आज के बाद

https://marathikavita.co.in/index.php?topic=88305.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, २ ऑगस्ट, २०२६

मर्त्य शून्यत्व

मर्त्य शून्यत्व

येणे इथवर, जाणे कुठवर, काय तत्त्व
करुनी अट्टाहास शेवटास, उरे शून्यत्व
 
जगता हव्यासापोटी, रे अनुकरणाच्या
हरवून जाते जोपासलेले मुळचे स्वत्व

भ्रामकतेच्या या पोकळ ओझ्याखाली
जपले जाते का कुठे, आजकाल सत्व

ढासळत्या गर्दीत या नैतिक मुल्यांच्या
मिरवायचे कुठवर, आपलेच स्वकर्तृत्व

जाणता,सत्य जात नाही काही इथूनी
अंती, शून्यात हो विलीन मर्त्य शून्यत्व

https://marathikavita.co.in/index.php?topic=88038.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, ३० जुलै, २०२६

ओढ ३००७२०२६ yq २३:०८:१९

ओढ

ओढ संपलेली नसते
कुठेतरी ती दडलेली असते 
वाट पाहते मोक्याची
आणि, पटकन उसळी घेते
ताटवा असो वा बाग
ओळखीच्या फुलांस शोधते 
कुणी प्रेम वगैरे म्हणतं
खरं सांगू,तसे काहीच नसते 
ओढ खरी, अंतरंगांची
आत्म्यास, आत्म्याची असते 
उगाच का इवली फांदी
कडेवर, फुलाला जोजवते?

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, २४ जुलै, २०२६

वराती मागून घोडे

वराती मागून घोडे

हक्काचे दार सहज उघडते कुठे थोडे
झिजवावेच लागतात त्या साठी जोडे

ध्येयासाठी अन्यायाला वाचा फोडून  
हाल अपेष्टा भोगत, धरणे धरती वेडे

शिक्षणा करता ऐकून रास्त मागण्या
का नाही उलगडले शिक्षितांना कोडे?

शुल्लक म्हणता अखेर घाम फोडला
व्यवस्थेने का घेतले उगाचचे आढेवेढे

लाज जाईल म्हणून, अंततः बिथरले
अन् दौडले त्वरीत वराती मागून घोडे

https://marathikavita.co.in/index.php?topic=87303.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, २२ जुलै, २०२६

युगांत

युगांत

एक एक पर्व, येते जाते
उदय अस्त होत असतो
न् लढाईत अस्तित्वाच्या
व्यवस्थेचाही, अंत होतो

मात्र भास आभास फक्त
शाश्वत, असे काही नाही
सुखदुःखाच्या चष्म्यातून
जो तो केवळ पहात राही

मी, माझं, मला असल्या
जरी केल्या किती वल्गना
युगांत होताना या चराचरी
कुणाचाही पार हो लागेना

https://marathikavita.co.in/index.php?topic=87094.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, २१ जुलै, २०२६

रंगकण

रंगकण

अजूनही मी जपले आहेत रंग नभातले
मिसळले होते, कधीकाळी रंग प्रेमातले

का न कळल्या, छटा तुला कधी त्यांच्या 
कित्येक वर्ख, भावनांचे त्यावर लेपलेले 

दाटून येते मन, मेघांसम एकट्यात कधी
स्मरते का?तूच होते कधी त्या व्यापलेले

बरे आहे अताशा आकाश माझे मोकळे
दिल्या घेतल्या अनुभवांनी झाकोळलेले

भ्रम म्हणावा की वेडेपणा नुसता मनाचा
शोधतोय रंगकण आसमंतात विखुरलेले 

https://marathikavita.co.in/index.php?topic=86862.new#new


©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, १८ जुलै, २०२६

अजनबी मौसम १८०७२०२६ yq १०:१९:३५

अजनबी मौसम 

ठहरा हुआ मौसम कोई अजनबी जैसा
मानो क्षितिज चौखट पर शामको फसा

बादलों मे निले काले पानी का है बसेरा
घुमने टहलने उन्हें खुला आसमान सारा

बरसे या न बरसे?पडे बादल उलझन में
जडें जमाएं दरख़्त पुराना खडा चिंता में

कुछ भी ना समझे, असमंजस मन मेरा
अच्छा कहूं या बूरा ऐसा यहांपर नजारा


©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, १७ जुलै, २०२६

दुर्दशा

दुर्दशा

कधी होते, पावसाची प्रतीक्षा      
कधी होते, त्याची पण उपेक्षा 

तो कोसळो किंवा न कोसळो 
गुपचुप बोलणी खातो हमेशा 

अतिवृष्टी नाहीतर आहे कोरड
आपल्याच कर्माची, ही शिक्षा

मला वाटतं, आपणच कारण!
संपवून पर्यावरण केली दुर्दशा

करून सवरून नको ते उद्योग
उलट आम्हीच ठेवतोय अपेक्षा 

https://marathikavita.co.in/index.php?topic=86485.new#new


©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, १४ जुलै, २०२६

कर्मभोग

कर्मभोग

योग वियोग, आयुष्यातले भोग सारे 
ऐषाराम, कधी फरपटीचे दूर्योग सारे

इहलोकी नातीगोती,मैत्री, भेटीगाठी 
विधिलिखित जुळलेले हे संयोग सारे

अपपर भाव अन् हेवेदावे तूझे माझे  
मानवी मनाचेच अवघे रे उद्योग सारे

पळवाट शोधण्या नित्य कष्टा पासून 
मूढ मानव ठरवूनच करतो ढोंग सारे

प्रेम,आपुलकी, विरह न् दु:ख,दुरावा 
जीवनातल्या स्थित्यंतराचे भोग सारे

सुटले ना, देव दानव, मानव त्यातून
कुणा न चुकले 'शिव' कर्मभोग सारे

https://marathikavita.co.in/index.php?topic=86245.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, १० जुलै, २०२६

हातोडा

हातोडा

पावसाचा जोर, थोडासा काय वाढतो
कनेक्टींग लिंकचा, स्लँबच कोसळतो

पुलांची पण आता, सुरू झाली स्पर्धा 
कुठे कोसळतोय अख्खा न् कुठे अर्धा

दोष भुकंपाला देई कुणी एक ठेकेदार 
उद्घाटने नी फोडाफोडीत दंग सरकार

अँक्ट ऑफ गॉड की नैसर्गिक आपत्ती
काहीही असो,आहे जनतेचीच संपत्ती

टक्केवारी,हिश्यांचा मोह आता सोडा
त्रासलेल्या जनतेकडून पडेल हातोडा

https://marathikavita.co.in/index.php?topic=85780.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, ९ जुलै, २०२६

येत जा सखे

येत जा सखे

अप्सरा म्हणू की, म्हणू तूला, मोहना
वेड लावते मनाला, अशीच तू यौवना

तू कोमला,चंचला लाघवी रूपगर्विता 
नाद लावी चाहूलीने येथल्या मनामना

बावरतो हरवतो हा जीव वेडा भाबडा
आठवूनी सुंदरी, मदालसा तूला पुन्हा 

जणीवेत चुंबनाच्या अमृतमय ओढीने
तापते अंग अंग,जाळते झनी तनामना

तलम, सुस्त मृदुला, पहाट स्पर्शातली 
ठेवते मधुर मधुर, तनुगंधातल्या खुणा

आवर्तनात खेळण्यास शृंगार खेळ हा 
फिरूनी येत जा सखे, स्वप्नात तू पुन्हा

https://marathikavita.co.in/index.php?topic=85779.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, ७ जुलै, २०२६

रोज एक नवा

रोज एक नवा
ऐकून धरेचा, व्याकूळ टाहो 
आसमंतात कल्लोळ उठतो
एक एक मेघ सावळ काळा 
होऊन बेधुंद बेफाम बरसतो

काहूर द्विधा मनी असताना 
विचारांचा गोंधळ का उडतो
होतात चूकीचे फैसले काही 
अन् पुन्हा,गुंत्यात गुरफटतो

जो तो व्यस्त आभासात येथे 
स्वतः मधेच दंगलेला दिसतो
बोलावे कुणा, वाटते कैकदा 
ऐकण्यास वेळ कुणा असतो

उद्रेक व्यापांचा, अंतरी होता 
विचारांचा सर्व लाव्हा फुटतो
एकटाच, कुठे तु रे गडबडतो 
रोज एक नवा वाटेवर दिसतो

https://marathikavita.co.in/index.php?topic=85543.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, ६ जुलै, २०२६

जारे जारे पावसा ०६०७२०२६ yq १४:१२:०६

जारे जारे पावसा 

जारे जारे पावसा
तुला देतो पैसा
पैसा आहे खरा
तु गेलेला बरा

ये रे म्हणता आला
वेड्यागत बरसला
खुप आला धावून
गाड्या गेल्या वाहून

धांदल झाली लोकांची
वाताहात सगळ्यांची
आता जरा थांबशील
थोडासा विसावशील

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, ३ जुलै, २०२६

तुम और साथ ०३०७२०२६ yq १७:२४:०८

तुम और साथ

तुम साथ नहीं हो तो
क्या, ये जमाना रुकेगा?
तुम घमंड करती रहों
आपुन तो नहीं झुकेगा!

शायद, लगता है तुम्हें
होगी जिंदगी मेरी सुनी!
बेफिक्र हो, तुम जियो
कोई और होगी दिवानी!


©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, २ जुलै, २०२६

गती ०१०७२०२६ yq २०:१८२५

गती

आयुष्य जेव्हा शर्यत होते
स्वतःच, स्वतःचे स्पर्धक होते
एक धावू पाहतो पुढे विचार
दुसरा, म्हणे कर पुन्हा विचार 

थोपवते, थांबवते अचानक
माघारी ओढते कधी हक्काने
याच स्पर्धेत गुंतते आयुष्य
चालते मग,आपल्याच गतीने 

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

नजाकत

नजाकत

अलवार भावनेचा हुंकार नजाकत
शब्दांतला हळवा उच्चार नजाकत

पदन्यास थरथरता, तो ठेक्यावरला 
गिरकीत सावरलेला तोल नजाकत

अनेक छटा येथे ऋतूंच्या बदलत्या 
मृदगंध पावसाळी, एकच नजाकत

बाल मुखातील अप्रूप, बोल बोबडे
उच्चार हळूच तीचा,बाबा नजाकत

तमा न कसली उन,वारा,पावसाची
दर्शन होते सावळ्याचे,ती नजाकत

https://marathikavita.co.in/index.php?topic=85130.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, २५ जून, २०२६

शुष्क अश्रू

शुष्क अश्रू

आगमन मुळी इहलोकी, टँहच्या सुराने
पाचवीलाच पुजली जाती अनेक रुदने

स्मरूनही शाळेतल्या, आर्त बाल हाका 
तरीही ना सुटले एका तपाचे जाणे येणे

तारुण्यातही ना, तुटले पाश विलापाचे
घरी दारी कधी पोळले गेले हात वेदनेने

ओढ लागता मनाला,जीव हताश होतो
भरून जातो उर तेव्हा, मुक आक्रोशाने

सर्वत्र असते दु:ख, निराळे वार्धक्यातले
कुरवाळत गत स्मृतींना मुक्यानेच रडणे

थांबावी वाटते एकाएकी ही रुदन यात्रा
अन् दाबून वेदनांना, शुष्क अश्रू ढाळणे

https://marathikavita.co.in/index.php?topic=84535.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, २२ जून, २०२६

गारुड

गारुड

भरून येता नभी एखाद मेघ सावळा
घेतात हेरून आठवणींना कातरवेळा

झुरते सृष्टी न् कष्टी होते मावळतीला
घेत मनी हुरहूर,अवघा झुले हिंदोळा

अस्ताचली दिवाकर जातांना तांबुस
भास असा जळात बागडती ज्वाळा

विखरून रक्तिमा क्षितिजावर हलका
अलगद घुमतो वाऱ्याचा सूर आगळा

नभी तुटक परतीची, ती खग रांगोळी
दूर किणकिणती गुरांच्या घुंगुर माळा

मनमोहक जरी करी अंतर्मुख सकलां
गारुड मनावर का घालती कातरवेळा

https://marathikavita.co.in/index.php?topic=84262.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

अकेले

अकेले

समय बदला, अब तनहा रहते है हम
मसरूफ़ तुम्हारे इश्क में थे कभी हम 

जमाना और तुम भी, जानते थे सच
इश्क पे परवान चढ़ाया करते थे हम

वक्त की आज के, पुछो ना हकीकत
तस्वीरों के सहारे कैसे बिताते हैं हम

बेजुबान दहलीज भी करतीहै सवाल
देखकर अकेले, क्या जबाब देगें हम

मसरूफ़ तुम्हारे इश्क में थे कभी हम
समय बदला,अब अकेले रहते है हम

https://marathikavita.co.in/index.php?topic=84141.new#new


©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, २१ जून, २०२६

शर्वरी

शर्वरी

दिवस रात्र खेळ हा, सृष्टीची सृजनता
तुझे मला, माझे तुला, देणेघेणे दिगंता

तू आर्तता,तूच शांतता, संधेची पुर्तता
यामिनी, तू कामिनी, नभीची निरवता

घेऊनीया ध्यास तू,स्वप्नांची आरास तू
तूच एक स्तब्धता, कवेत,आसपास तू

थकल्यास आधार तू, कष्टास उतार तू
झोपेत अंधार तू, प्रेमिकांची ती उब तू

अशी उगवते शर्वरी घेऊनी चांदणे उरी
दाह देते विरहाचा, व्यापूनी सर्व अंबरी

https://marathikavita.co.in/index.php?topic=84122.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, १९ जून, २०२६

अपरिहार्य

अपरिहार्य

शोधण्यात मुर्त अमूर्त आयुष्य सरले 
भ्रमच फक्त ते, आपले होऊन नुरले

करता मी, माझं, मला जन्म सरला
वळून पाहता माघारी रितेपण उरले

आकार निराकारात भास हे जगाचे
जाणण्या अस्तित्व, जीवन रे सरले

व्हावे सावध, वेळीच वाटले कैकदा
ऐहिकाने आहे ना, जीवन हे भारले

कळले हो, कष्ट जीवाचे शिवा म्हणे 
अपरिहार्य तरी भोगणे अजूनी उरले

https://marathikavita.co.in/index.php?topic=83883.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, १४ जून, २०२६

आनंद ओळी १४०६२०२६ yq १६:२९:१२

आनंद ओळी

होता कार्य काही मनाजोगे
दौडती वृत्तीत आनंदलहरी
रम्य भासता भोवती सगळे
आनंदी वाटे जग अष्टोप्रहरी

क्षण सौख्याचा, वा हर्षाचा
ठरवितो अवघा मन पसारा
सेवाकार्यी मग सहज गुंतते
दैवत मानून निसर्ग हा सारा

चंचल मन,भिरभिरे अखंड
व्याकुळता कधी सांजवेळी
अल्हादक न् फुंकर घालती
कवितेतल्या या चार ओळी

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, ८ जून, २०२६

आनंद भरारी

आनंद भरारी

बोलता बोलता शब्दांची या मैफल जमते
"गा गा ल गा ल गा गा" लगावली स्फुरते

शब्दागणिक आवर्तन, मन, भावभावनांचे 
सहज बहरत अनोखे शब्दशिल्प अवतरते

वेचता विविध आनंदकण इथे जीवनातले
म्हणता आनंदकंद वृत्तामधली गज़ल होते

अस्थायी तरीही आसक्ती क्षणिक सुखाची
जगण्यातल्या सुंदरतेची, एक ओढ लावते

शोधात प्रत्येकजण, सापडावा आनंदकण
मात करुन स्थितीवर फिनिक्स भरारी घेते

https://marathikavita.co.in/index.php?topic=83074.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, ५ जून, २०२६

ठहराव

ठहराव

"व्यक्ती तितक्या प्रकृती"
म्हटलेच आहे बरोबर कुणी
भेटतात काही लोक असे
म्हणून पटते म्हण हि जुनी

असून विदीर्ण खोल आत
दर्शवती काही सुखी वर वर
जगतात तरी ही आनंदाने
ठेवून दगड स्वतः ह्रदयावर

म्हणो स्टाईल,पध्दत कुणी
वेगळी शैली इथे जगण्याची
मस्तीत फक्त जगणं ठावूक
कशाला पर्वा, तमा कुणाची

पहायचा,जगायचा असतो
क्षण क्षण आनंदी भोवतीचा
कुणास ठावूक येईल कधी
                                                                                                    अचानक ठहराव स्तब्धतेचा
https://marathikavita.co.in/index.php?topic=82893.new#new
©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, २ जून, २०२६

सत्ता ग्रस ०२०६२०२६ yq १५:००:१५

सत्ता ग्रस

कळेना हेतू कोणता, बाळगून अंतस्थ
खेळात सत्तेच्या जो तो दिसतो स्वस्थ 

गाठताच कधी मंत्रालयी त्यांचे दालनी
तेथे ही असतात नेहमी महोदय व्यस्त

चालतात नियमित दौरे, सभा, बैठका 
भेटीस यांच्या, सामान्य कायमच त्रस्त 

राबवता योजना अनेक लोकोपयोगी
गुपचूप होते वाटपामधून लोणी फस्त

दात वेगळे दोन्ही, दाखवायचे खायचे
म्हणून आहेत,का यांच्यातले मदमस्त

पक्षा करता सांभाळता, स्वार्थ सर्वथा
सोड जनहित,नित्य राजकारणी ग्रस्त

विडंबन कविता, Jun 02, 2026 YQ 03:00:15 PM

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, १ जून, २०२६

चार शब्द ०१०६२०२६ yq १०:१०:१५

चार शब्द 

नकळत कधी कुणी कुठे जुळला जातो
सवयीने मग हळूच त्यांचा अंकित होतो

परिस्थितीत भोवती येथे आजकालच्या
पावलागणिक तो दबलेला दृष्टीस पडतो

सज्जन दुर्जन, दुष्ट सुष्ट सारे नांदती येथे
स्वार्थने,अन्यायाने कुठेतरी अधीन होतो

एक ठरतो अव्वल जेता लढाईत साऱ्या
अन् छातीवर ईतिहासाच्या नाव कोरतो

स्विकारावे आवाहन जगताना या जगाचे
अल्पमती मी चार शब्द माझे इथे मांडतो

प्रेरणादायी कविता, Jun 01, 2026 YQ 10:10:15 AM

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, ३० मे, २०२६

चुकीत मजा

चुकीत मजा

किती म्हणून सांगू मी माझ्या चुका 
करण्या त्या गवसतोच मला मौका 

सहज बोलणे, बोलतो जरी एरव्ही 
लिहिण्या सुचते शब्दांची मालिका 

कसली जादूगरी हि काही कळेना 
स्पर्श या नव रसांचा कळतोय का

चुकांमधून उमटती भाव वेगवेगळे
कंगोरे भावनांचे ह्या उमगतात का 

काही आपसूक,होती मुद्दाम काही 
हं,करण्या चुका, मजा येते बरं का 

https://marathikavita.co.in/index.php?topic=82366.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, २७ मे, २०२६

हालात देश के २७०५२०२६ yq १६:३०:३०

हालात देश के

कुछ समझ में नहीं आते 
देश के हालात ये आजकल
खाडी युद्ध की वजह से
महंगाई बढ गई है आजकल

चरम पर भरष्टाचार यहां
हर काम में रिश्वत आजकल
नेता, धनी धनवान हुए
गरीब, और गरीब आजकल

तेल,खानपान सब महंगा
साथ महंगी पढाई आजकल
सुकून से जीना चाहे कोई
बोलो कैसे जिएंगे आजकल

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, २६ मे, २०२६

संघर्ष चर्चा























संघर्ष चर्चा

रोजचा संघर्ष माझा का कुणास सांगू नये  
होईल नाराजी, म्हणून का व्यक्त होवू नये

असूनही भरमसाठ,योजना न् प्रश्न समोरी 
अंमलबजावणीस त्यां फुका वेळ दौडू नये

बदलला साराच ढाचा व्यवस्थेचा येथल्या 
लठ्ठ सत्तेपुढे कैफियत का कुणी मांडू नये 

पावलागणिक मागण्या, कामे मंजुरीसाठी 
वाढलेल्या भ्रष्टाचाराची,चर्चा का करु नये

ठेवावी मनी लाज जरा जनाची वा मनाची 
द्यावे लागते उत्तर शेवटी, सत्य विसरु नये 

https://marathikavita.co.in/index.php?topic=81887.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, २५ मे, २०२६

मौन

मौन 

बरेच म्हणतो अडचणीत या आहे मौन माझे 
दृश्य बाहेरचे विचलित करते सुख चैन माझे

गोंधळ सदृश्य स्थिती,बोकाळली सर्वत्र तेथे
काय काय पहावे?संभ्रमात पडती नैन माझे

आगडोंब सृष्टीचा न् महागाईचा रोष थोरला
सतत सर्वांसह उगाच ठेवतो मन बैचेन माझे

बाता प्रगतीच्या जाहिरातीतल्याच हो शेवटी
ऐकून वाचून सदोदित का दूर होते दैन माझे

व्यथा मनातली, कुठवर आता रोज मांडावी 
बहिऱ्या यंत्रणेत इथल्या,बरे आहे मौन माझे 

https://marathikavita.co.in/index.php?topic=81833.new#new
©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, २३ मे, २०२६

लोकं काय म्हणतील

लोकं काय म्हणतील

चार लोकं काय म्हणतील यातच वेळ गेला
त्या चार लोकांपैकी एक कामी नाही आला

सर्व जबाबदाऱ्या काही ओझी आणि चिंता
विचार करणारा,मात्र कायम वाहत राहिला

कुणाला नसते पडलेली उगाच कुणाची इथे
जो तो असतो नेहमी, मस्त स्वतःत रमलेला

हिच शिकायची, खरी दुनियादारी जगताना
आवडतं ते करावं,आनंदात ठेवावं स्वतःला

लोकांचं तर कामच आहे,करु देत, ते त्यांना
चार लोकांच काय जातं काहीही बोलायला

https://marathikavita.co.in/index.php?topic=81596.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, २२ मे, २०२६

परीक्षा जिद्दीची

परीक्षा जिद्दीची

वाटते आहे अवघड वाटचाल जगण्याची
खरी अविभाज्य अहमहमिका जीवनाची 

खडतर जरी मार्ग, पावलोपावली इथला
लढायचीच आहे येथे लढाई अस्तित्वाची

थकू नको हारु नको,माघार मुळीच नको 
ठेवून ध्येय मनी सोड निशाणी पावलांची 

कोणतीच वाट नाही सहजसाध्य जाण तू 
क्षणोक्षणी घेतलीच जाते परीक्षा जिद्दीची 

आठवतो मंत्र पुरातन 'थांबला तो संपला'
विसरून त्या, लिही कहाणी जिंकल्याची

https://marathikavita.co.in/index.php?topic=81573.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, १९ मे, २०२६

बातचीत १९०५२०२६ yq १३:०३:०७

बातचीत

आज खुद में इतिहास समेटे
ऐसी कई इमारतें खामोश है !

याद कर स्वर्णिम अतीत को
परिंदों से बातचीत करती हैं !

ऐसाही हाल कुछ बुजुर्गों का
जमाने में आजकल होता है !

अकेलेपन के, बोझ के साथ
अंदर ही अंदर रोते रहता है !

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, ७ मे, २०२६

निरागस

निरागस

उन्हाळ्याची सुट्टी कुठे सर्वांच्या नशिबी 
बाहेर 'कडक' उन,गर्दी अशीबी तशीबी

हरवलेली सावली वाऱ्याचा पत्ता नाही 
आग ओकतो सुर्य अंगाची लाही लाही 

आपणच रे कारण बेसुमार वृक्ष तोडतो 
मग,निसर्ग काय तुम्हास सहज सोडतो 

अवकाळी,कधी कोरडा,ओला दुष्काळ
तो निरागस,आपणच घेतो त्यावर आळ

घालवायची जर मस्त उन्हाळ्याची सुट्टी
तर जप निसर्ग न् कर त्या सोबत दोस्ती

https://marathikavita.co.in/index.php?topic=80770.new#new


©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, ५ मे, २०२६

डावा अंगठा

डावा अंगठा

कितीही शिकले सवरले असा
पाळावी लागते चौकट नियमांची
असो, खरेदी विक्री हक्कसोड
एक वेळ येतेच अंगठा लावायची

जमीनजुमला, इस्टेट म्हणून
दुभंगली गेली प्रसंगी वैरी झाली
कित्येक परिवार आणि कुटुंबे
एकमेकांपासून कायमची दूरावली

रित्या हातीच येणे जाणे इथले
कळूनही सत्य हे खरे वळत नाही
काही नसते शेवटी सोबत,तरी
सत्ता न् संपत्तीची हाव सुटत नाही

https://marathikavita.co.in/index.php?topic=80608.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, १ मे, २०२६

स्व-सन्मान

स्व-सन्मान

आज करतोय कामगार दिन साजरा
प्रत्यक्षात आहे कामगार दीन बिचारा,
अतिशयोक्तीपुर्ण काही नाही सांगत
खात्री करण्या आमगारानांच विचारा !

व्यवसाय सारे, मंदावल्यात नोकऱ्या 
त्यातच सर्वत्र बेरोजगारी फोफावली,
तुटपुंज्या, सकल व्यवस्थेची इथल्या 
हि प्रातिनिधीक कैफियत हो मांडली !

आधार कष्टकरी, कामकरी, शेतकरी 
तारणहार अवघ्या साऱ्या या जगाचा,
थोडा तरी दृष्टिकोन बदलायला हवा 
त्यांनाही आहे हक्क, स्व-सन्मानाचा !

https://marathikavita.co.in/index.php?topic=80301.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

हिसाब किताब ३००४०२६ yq २०:५३:०७

हिसाब किताब

मोहब्बत की आख़िरी चिठ्ठी
शायद, मैंने तुम्हें लिखी थी,
पढीं थी,या अनदेखी कर दी
जिम्मेदारी तो तुम्हारी ही थी!

लिखा था उसमें अपना हाल
और,पुछा था तुम्हारा हाल!
इंतजार करते वक्त बीत गया
कुछ न हुआ,हुए दोनों बेहाल!

अब तो सारे मायने बदल गए
चिठ्ठियाँ और पत्र लिखने के,
सिर्फ एक मोबाइल कॉल पर
हिसाब किताब होतें हैं प्यार के!

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, २५ एप्रिल, २०२६

तु सांग ना

तु सांग ना

पुस्तकातील प्रत्येक पानावर,आहेत काही खास खुणा
काळ लोटला जरी किती तरीही चाळतो मी पुन्हा पुन्हा

उसवत्या आठवण वीणी सोबत मन भूतकाळात जाते
नकळतपणे गुरफटते अन् गुंतण्याचा घडतो नवा गुन्हा

होता चूक काही अजानता, ठरवावे आरोपी कसे मला
नव्हती ईच्छा मुळात दुखवायची मला सांग खरे,हो ना

होऊ दे जे काही व्हायचे,आता पर्वा कशाला करायची
कोण कशासाठी बोलतो, वाटते त्यांचे, त्यांना कळेना

चाललो कुठे या सांप्रत काळी, कळेना बहुदा कुणाला
उमगलेच जर काही तुला, परमेश्वरा तु सर्वांना सांग ना

https://marathikavita.co.in/index.php?topic=79667.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, २४ एप्रिल, २०२६

म्हणून कदाचित

म्हणून कदाचित

तू फक्त लढ जिद्दीने,प्रत्येकजण हे सांगतो
करु पहाता काही,कुणीतरी खोडा घालतो 

जगरहाटी अशी चालते,खात्रीपूर्वक वाटते
स्पर्धेत जगण्याच्या, प्रवास अवघड वाटतो 

हलक्यात घेवू म्हणता येथे काहीच जमेना 
पावलागणिक इथे टेबल चिरीमिरी मागतो

कोणती नीतिमत्ता कोण पाळतो ते कळेना
रोज एका नव्या क्लृप्तीवर माणूस भाळतो

आदर्श म्हणून घ्यावे, भोवती कुणी दिसेना 
जावून मठा,देवळात जो तो त्यांना शोधतो 

त्यागता येत नाही, म्हणून कदाचित जगणे
मरणही हल्ली कुठे रे स्वस्त?म्हणून जगतो

https://marathikavita.co.in/index.php?topic=79366.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, १९ एप्रिल, २०२६

ढगांची नक्षी

ढगांची नक्षी
प्रदूषण आणि भोवताली
ईमारतींच्या गराड्यात,
मोकळे ढाकळे आभाळ
दिसते कुठे हल्ली शहरात?

आज सवड मिळाली
आणि शहरा बाहेर गेलो,
ऑक्सिजन तर मिळाला
बऱ्यापैकी ढग पाहून आलो!

दाटून आलेले अनेक ढग
होते घेऊन वैविध्यपूर्ण नक्षी,
वेगवेगळ्या विचारांची, जणू
सतत बदलणारी माणसं जशी!

कोण खरं? कोण खोट?
बहूदा त्यांनाही माहीत नसावं,
कुठे कधी आणि कसं!
उगाच का, अवकाळी बरसावं?

https://marathikavita.co.in/index.php?topic=79207.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, १७ एप्रिल, २०२६

कल्पना १७०४०२६ yq १४:२६:०६

कल्पना

मन का आईना
ढूंढता है मन को
परत दर परत

उदास फिर भी मन
दिखती नहीं उसे
खुद की असली सुरत

अक्सर यही होता है
एक कल्पना लेकर
खोजते है स्वयं को
लेकर अनगिनत सपने
जो कल्पना होती है
खुद के मन की

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, ११ एप्रिल, २०२६

सांधणे ११०४२०२६ yq १७:४८:१०

सांधणे

भिंतीच्या भेगा बुजवता येतील
मनावरच्या ओरखड्यांच काय?
वर वर मलमपट्टी होऊन जाईल
आतला घाव मिटून जातो काय?

ठरवून नाही होत, काही चुका,
चुकूनच दु:खाला कारण होतात
विसरून जावू म्हणता म्हणता
तेवढ्या खोलवर रुतून बसतात!

चालायचंच, म्हणून सोडून देता
फिरून नव्याने गाठी बांधायच्या
पडक्या घरात राहतं का कोणी?
पडलेल्या भेगा हळू सांधायच्या!

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, ६ एप्रिल, २०२६

बात की बात

बात की बात

जो ना मिल पाया...उसे सोचना क्या
जो ना कुछ बोले..उससे बोलना क्या

रह एक भली अपनी जानी पहचानी
अनजान राह पर अकेले चलना क्या

चाहे सुहाने लगते अक्सर ढोल दूरके
जरूरत नहीं तो, जबरन देखना क्या

फिसलती है जब रेत अक्सर हाथोंसे
बेवजह आखों में उसको बसाना क्या

हरकोई बात जबभी होती है वक्त पर
तो छोड़ देना उसे,बेकार सोचना क्या

https://marathikavita.co.in/index.php?topic=78867.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२६

शब्द गारुड ०३०४०२६ yq १०:१७:१७

शब्द गारुड 

काहीतरी लिहायचं आहे आज मनात साठलेलं 
झाड होईल मन, जसं पानगळ होऊन वठलेलं!

निचरा होईल भावनांचा, नी पालवी नवी फुटेल 
चमकतील भाव,जणू कोवळं पान लुसलुसलेलं 

वाहते नादात आगळे अबोल ऋतूचक्र अविरत
होऊन एकरूप ते, मनामनाशी अतुट जुळलेलं!

एक एक छटा घेऊन, सोबतीला सप्तरंगी वर्ख 
भासे शब्दशिल्प एकमेकात सहजपणे रंगलेलं!

भावना उतरतात हळूवार, उमटतात कागदावर
करती गारुड मनावर, जणू पिसं एक लागलेलं!

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, १ एप्रिल, २०२६

दो स्वरूप

दो स्वरूप 

है सारा मनगढंत खेल
ईश्वर और मानव
प्रकृति को भुलाकर हमारा मेल !

कहां है दोनों का मेला
सुरज और चंद्रमा
रात का अंधेरा दिन का उजाला !

कहां टिकता है ठाँव
आस्था एवं विश्वास
गहराता है, दुविधा में मनोभाव !

कौन पुर्णरुप स्वरूप
ईश्वर और मानव
एक मे ही हैं बसें दोनों ये रूप !

https://marathikavita.co.in/index.php?topic=78417.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, ३० मार्च, २०२६

घराघरात, खरात जोरात

घराघरात, खरात जोरात

आंधळं दळतं न् कुत्र पिठ खातंय
खरात मुळेच, हे मात्र स्पष्ट होतंय!
दरम्यान कुणासाठी होतं प्रशासन
कैक अशा प्रश्नांच मोहोळ उठतंय!

सत्तेसाठी हवी आहे आणखी सत्ता
प्रत्येकाचे गाऱ्हाणं, येथे एकासुरात,
असल्याच संधींचा उचलून फायदा
शिरकाव करतो ना,भोंदू घराघरात!

शासकीय उत्तर,चौकशी सुरू आहे! 
जबाबदारी सरकारवर टाकणार का?
आरोपी सोबत, मदत करणाऱ्यांना
इमानदारीने शिक्षा ठोठावणार का?

https://marathikavita.co.in/index.php?topic=77974.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, २६ मार्च, २०२६

ससा आणि पारधी

ससा आणि पारधी

बुवाबाजी,अनैतिकतेचे नवीन घपले!
सर्कशीतून या काही सुमडीत सटकले!

कुणी बोटं कापून न् तांब्याभर पिवून
देणग्यां सोबत रक्ताने अभिषेक केले!

आता, कुणाचं, काय छाटलं जाईल ?
म्हणून काही अज्ञातात जाऊन लपले!

कधी, मथळ्यात चमकावले ज्यांना 
आता, टांगत्या घोटाळ्यात लटकवले!

'या टोपी खाली दडलयं काय' म्हणता
हिरवळीच्या नादी, मृगजळात फसले!

चालायचंच बुवा हे राजकारण आहे
ज्या हाती ससा, तो पारधी हे उमगले।

पुरोगामी होते, महाराष्ट्र राज्य कधी
हल्ली मात्र सर्वांनी अंधश्रद्धेत लोटले!

https://marathikavita.co.in/index.php?topic=77444.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, २५ मार्च, २०२६

कुणास ठाऊक

कुणास ठाऊक

शिकल्या सवरलेल्यांना एक अडाणी फसवतो
त्यांच्या लालसा, ईच्छांचा उपयोग करून घेतो

सुधारला समाज, म्हणून सतत डंका पिटणारा
जाहिरातींसाठी खुशाल बाबांचे फोटो मिरवतो

समजात वावरणारा नी सत्ताकारणात रमणारा
स्वतःची बोटं कापून, रक्ताचा अभिषेक करतो

बाबा तरी काय करणार,स्वार्थींच्या घोळक्यात
कोटींची माया जमवताना स्त्रियांची अब्रू लुटतो

आता होतील सखोल चौकश्या न् आयोग वगैरे
कुणास ठाऊक! दरम्यान तो जगतो की मरतो?

https://marathikavita.co.in/index.php?topic=77423.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, २४ मार्च, २०२६

राहू दे आठवणी

राहू दे आठवणी

तुझ्या जवळ राहू दे आठवणी माझ्या 
माझ्या जवळ राहू दे आठवणी तुझ्या 

स्मरणात राहतील काही तुझ्या माझ्या 
विस्मरुन जातील काही तुझ्या माझ्या 

आयुष्यभर चालता,खेळ आठवणींचा 
काय होईल मनस्थितीचे तुझ्या माझ्या 

सुत्रधार कोण सर्व या स्मृती खेळाचा?
लपंडाव म्हणू प्राक्तनाचा तुझ्या माझ्या 

ठसे गहिरे, मानले जरी हे गत काळाचे
देठ कायम हिरवे?मनात तुझ्या माझ्या 

https://marathikavita.co.in/index.php?topic=77322.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

पाठीराखा तु समर्था

पाठीराखा तु समर्था

करु कशाला उगाच चिंता, पाठीराखा जर तु समर्था
ठायी तुझ्या करतो अर्पण, जीवन माझे अवघे आता ||धृ|| 

भय दु:खातून देते मुक्ती | भक्तवत्सल कारुण्य मुर्ती 
आहे अशी अपार शक्ती | थोर तुमची ब्रम्हांडी किर्ती
सर्वांचे दयाळू तारणहर्ता | तुम्ही भक्तांचे रक्षणकर्ता
करु कशाला उगाच चिंता, पाठीराखा जर तु समर्था
ठायी तुझ्या करतो अर्पण, जीवन माझे अवघे आता ||१||

दत्तगुरुंचेच स्वरूप तुम्ही | नाम आशेचे वटवृक्ष स्वामी 
पाठीशी असता काय कमी | तव कृपेचे याचक आम्ही
व्हा कृपाळा आमचे त्राता | हे ची मागणे मागतो आता
करु कशाला उगाच चिंता, पाठीराखा जर तु समर्था
ठायी तुझ्या करतो अर्पण, जीवन माझे अवघे आता ||२||

नामजपाने चिंता हरती | शांती लाभते अक्कलकोटी 
सकलांची तु कारुण्यमुर्ती | दृष्टी असावी आम्हावरती 
कठीण काय कृपा होता | घ्यावे शरण 'शिवास' आता
करु कशाला उगाच चिंता, पाठीराखा जर तु समर्था
ठायी तुझ्या करतो अर्पण, जीवन माझे अवघे आता ||३||

https://marathikavita.co.in/index.php?topic=77309.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, २० मार्च, २०२६

छुपे चेहरे

छुपे चेहरे

छुपे रहते है चेहरे के पीछे चेहरे !
अक्सर कई अजीबोगरीब चेहरे !

मौसम की तरहां, वक्त वक्त पर
बदल जाते है, ये ऐसे छुपे चेहरे !

लगती होगी शर्म, गिरगिटों को 
तोहमत ऐसी लाते है झूठे चेहरे !

मुश्किलों भरा, दौर है यह मानो
समय के चलते,पढा करो चेहरे !

https://marathikavita.co.in/index.php?topic=76812.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९