बाल कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बाल कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ९ जानेवारी, २०२५

गाडी हो आली

गाडी हो आली

बघता बघता, कोण हो आली
झुकझुक करीत की हो आली

शिटी वाजली, चाहूल लागली
कंच्या गावची गाडी हो आली

मोठ्याने उडवित काळासा धूर
तोऱ्यात सुसाट अशी हो आली 

जायचं पुढं, ठरल्या स्टेशनावर
वाटेभर सर्वां, सांगत हो आली

ओलांडून नद्या, कित्येक दऱ्या
खडतर प्रवास करीत हो आली 

घेऊन सोबती, माणसांची गर्दी 
सोडाया त्यांना स्वतः हो आली

https://marathikavita.co.in/index.php?topic=49823.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९