शनिवार, ३१ मार्च, २०१८

टाळतो कशाला (गझल)

टाळतो कशाला (गझल)

बोलावतो प्रथेने तू भाळतो कशाला 
देतोय मान जेव्हा तू टाळतो कशाला 

होणार पुर्ण ईच्छा आता मनातली ती
चिंता उगाच ध्यानी तू पाळतो कशाला

ना छंद तीज फूले केसात माळण्याचा 
नाही म्हणून सुद्धा तू माळतो कशाला 

गात्रे जरी तुझी रे सारी शिथील झाली 
अश्रूंस मोल मोठे तू गाळतो कशाला 

आनंद या सुखाचा नाही जरी मिळाला
बा थेंब थेंब अश्रू तू ढाळतो कशाला

कैफात भारलेला स्वार्थी इथे जमाना 
ऊगाच जीव दोस्ता तू जाळतो कशाला

© शिवाजी सांगळे 🎭 
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/()-30635/new/#new

सोहळा



सोमवार, २६ मार्च, २०१८

हायकू २९१-२९३

#हायकू २९३

छायाचित्र सौजन्य: गुगल

#हायकू २९२

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू २९१
चमके विज
गहिवर नभाला
पाऊस आला २३-०३-२०१८

लिहूया म्हणतो

लिहूया म्हणतो 

दु:खाला आता जरा वेठीस धरूया म्हणतो
एखादी कविता दु:खावरती लिहूया म्हणतो

धुंडाळली अनेक गावे सुखाची काल परवा
उरली भेट दु:खाच्या गावा देवूया म्हणतो

आनंदाची, सुखाची गायलीत अनेक गीते
शेवटी सुर एक दु:खाचा आळवूया म्हणतो

स्मृती येथे चिरंतन प्रेमाच्या बांधल्या कुणी 
स्मारके अज्ञात शहीदांची स्मरूया म्हणतो

वाजत गाजत येताच वरात दु:खाची दारी
अंतिम यात्रा सुखाची डोळी पाहूया म्हणतो

© शिवाजी सांगळे 🎭 
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30580/msg70924/#msg70924

गुरुवार, २२ मार्च, २०१८

हायकू २८८-२९०

#हायकू २९०
बेभान वारा
लाटांचा खेळ सारा
हसे किनारा २२-०३-२०१८

#हायकू २८९
वाऱ्याचे गाणे
दरवळे केवडा
फुलांचा सडा २२-०३-२०१८

#हायकू २८८
तापले उन
वाऱ्याअंगी आळस
लाल पळस २२-०३-२०१८

बुधवार, २१ मार्च, २०१८

काही शब्द

....

काही शब्द
दूर दूर जाणाऱ्या
सावली सारखे...
काही... गुढ शांत
सायंकाळी वेढणाऱ्या
सावली सारखे...
मनावर गारूड करणारे
कधी गारूडी होणारे..
बिथरलेल्या मनाला
सहज डोलावणारे...
मीरेच्या विराणीतून स्त्रवणारे 
बासरीतून पाझरणारे
माऊलींच्या ओवीतील 
तेवणाऱ्या वातीतले,
तुकोबांच्या...
कठोर, मृदु वाणीतले...
असंख्यांचे... असंख्यांना
मोहित करणारे... 
शब्द
कवितेतून झरलेले

©शिवाजी सांगळे
२१-०३-२०१८

मंगळवार, २० मार्च, २०१८

हायकू २८५-२८७

#हायकू २८७
कोवळे पान
तांबूस मखमली
बाळसेदार २०-०३-२०१८

#हायकू २८६
ऋतू वसंत
प्रसवली पालवी
हिरवीगार १९-०३-२०१८

#हायकू २८५
पाण्यास स्पर्श
गोऱ्यापान पायाचा 
कंप पाण्याचा १७-०३-२०१८
©शिव

रविवार, १८ मार्च, २०१८

साथ



मला वाटते - कविता



नकोसे


http://marathikavita.co.in/gambhir-kavita/t30489/new/#new

पायरी



http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30480/new/#new

मनं

मन

धून मुरलीची

धून मुरलीची

धून कानी येता मुरलीची
गाई वासरे हंबरून येती

रेषेवरती त्या दूर क्षितिजी
सुवर्ण शलाका धूसर होती

घन शामल या अंबरातळी
वृक्ष पाखरे माघारी फिरती

निळ्या सावळ्या सांजवेळी
शित चंद्रमा हळूच प्रकटती

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita
/t30475/new/#new

फसवू नका मित्रांना

फसवू नका मित्रांना

डकवून ते खोटे डी पी 
फसवू नका हो मित्रांना,
साहित्य असेल ढापलेले
दाखवू नकाच मित्रांना !

काव्य, लेख बरेच काही
दाखवा तो वारसा मित्रांना,
स्वलेखन सुद्धा असो कसे
कळूदेत तेही सर्व मित्रांना !

चोरी तर चोरीच असते
कळते कधी तरी मित्रांना,
आवडले न् पोस्ट केले
उल्लेखून सांगा मित्रांना !

© शिवाजी सांगळे 🎭 
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/
preranadai-kavita/t30459/new/#new

नंतर नंतर

नंतर नंतर

सोसला भार झाडाने फळांचा पिकल्या नंतर
सोडला निश्वास फांदीने फळे खुडल्या नंतर

बहाणे, हट्टाने उधळणे कधी मुक्त स्वतःला 
सारे कळले सखे तुझ्या प्रेमात पडल्या नंतर

होतोय कमी दुरावा श्वासांच्या अंतरातला
होताच भेट तुझीमाझी मिठीत शिरल्या नंतर 

पानगळ शहरात इथे होते रानात तिथे ही
हळूवार ऋतूने आपली कुस बदलल्या नंतर

मोठेपण गारव्याचे उमगते साऱ्यास हल्ली
एकाएकी उन्हाच्या या झळा वाढल्या नंतर

कोसळतात परतूनी सरी पावसाच्या येथे
देणे भरल्या मेघांचे शिल्लक फेडल्या नंतर

© शिवाजी सांगळे 🎭 
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30449/new/#new

लळा शब्दांचा

लळा शब्दांचा

जिथे आसवांना येतो उमाळा
तिथे आठवांचा भरतो सोहळा

असता काळजी उरी जागताना
लवंडताच कसा लागतो डोळा

पोहचण्या आधी वैकुंठ नगरी
चालता वारीत दिसतो सावळा

उठाठेव कशा करू घोषणांची
दाऊन काम लोक करतो गोळा

ओळीं सोबत छापता गोड छबी
चाहत्यांचा फुकट्या भरतो मेळा

भले अशुद्ध अन् माना नियमबाह्य
लिहिताच शब्दांचा लागतो लळा

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30443/new/#new

जखमा

जखमा

जखमा जखमाच असतात
कुणाच्या पसरलेल्या, तर
कुणाच्या खोलवर असतात !

पापुद्रा धरतात कधी, काही
घेऊन अंतर्गत भळभळ
देत वेदना वहात असतात !

सल व्रणांचे कुरवाळताना
स्वतःच्या जखमा बऱ्याचदा
पहायला सोप्या असतात !
© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९

28-02-2018

तो जळला नाही

तो जळला नाही

http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30437/new/#new

सोपी कोडी

सोपी कोडी

नाहीच मी कुठलाही कवी 
गुण दोष माझ्यातले दावी 

टिपतो जे स्वभाव जनातले
वाटे ओळख त्यांची व्हावी 

लागले ग्रहण कसे उन्हाला 
सावली त्याच्यावर पडावी? 

फसले सारे चक्रात इथे  
घेता फेऱ्या गती तुटावी? 

जीवन खेळ हा प्रश्नोत्तरे  
सोपी कोडी कशी सुटावी

© शिवाजी सांगळे 🎭 
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30424/new/#new

शुक्रवार, २ मार्च, २०१८

रे सावळ्या

रे सावळ्या

रे सावळ्या मन गोकुळ होवु दे 
प्रेम भाव मना मनात जागु दे ! 

भेदभाव अंतरी जो नांदतो
धर्म जात कलह सारा जळू दे !

तन मन रंगले न् रंगले ध्यान
असा उधळ एकच रंग होवु दे !

एक नाद एक ताल विश्व भाव
सकलांत सूर सुमधुर नांदू दे !

प्रेम सुगंध प्रेम तरंग भु वरी
अलवार अखंड मुक्त वाहू दे !

© शिवाजी सांगळे 🎭
 संपर्क:९५४५९७६५८९

हायकू २७९-२८१

#हायकू २८१

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू २८०

छायाचित्र सौजन्य: श्री शिवाजी सांगळे

#हायकू २७९

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

गुरुवार, १ मार्च, २०१८

हायकू २७६-२७८

#हायकू २७८
सण होळीचा
उधळत्या रंगाचा
मनांदनाचा ०१-०३-२०१८

#हायकू २७७
माय मराठी
मज श्वासात वसे
बोलतो मराठी २७-०२-२०१८

#हायकू २७६

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर