शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३

भावना निनांद ३००९२०२३ YQ १३:०९















भावना निनांद 

अनभिज्ञ असता कुणी परस्पर

ओढ शब्दांची जोडते शब्दांना

तरंग प्रवाहात भावभावनांच्या

चढतेच रंगत खरोखर शब्दांना


शब्दांनीच सहजच जुळते नाते

शब्दांनीच आयुष्य खुलत जाते

मोहमायेत या जगात आभासी

अन्यथा कोण कुणाशी बोलते?


साधेच असते देणे घेणे शब्दांचे

अव्याहत नियम साद प्रतिसाद

जुळता नाळ कधी आपसूक ती

मनात गुंजे नित्य भावनानिनांद

©शिवाजी सांगळे 🦋papillon

 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, १९ सप्टेंबर, २०२३

सत्य शोध

सत्य शोध


ठरवून परस्पर घरदार जन्म येथे घेतो का कोणी 

कोण आपले, गैर कोण मुळी जाणतो का कोणी


कुणी जोडले नाते किनाऱ्याचे असे येथे लाटांशी

काय म्हणणे सागराचे त्यास विचारतो का कोणी


सारेच अंदाज आमचे येथले दरवळांवर बेतलेले

खाद्य स्वादा पलीकडले, दूजे चाखतो का कोणी


पुरेल कुठवर थिगळ रफु विरल्या वस्त्र नात्यांना

येते ढीलाई सुतास कातल्या आठवतो का कोणी


खरे खोटे, निती अनितीच्या, झाडतो स्वैर गप्पा

विधिनिषेध तयांचे वास्तवात पाळतो का कोणी


अल्प होते मिलन तिमिर प्रकाशाचे फक्त दोनदा

शोध सत्य 'शिव' जन्ममृत्यूचे जाणतो का कोणी

https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t44623/new/#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon

 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३

रुप तुझे














रुप तुझे

तुला ना मोह झाला तु तुझ्याच रुपात

तोही साऱ्या अशा बदलांच्या परीघात

वेळ तर बदलली, काळ ही बदलतोय

करून मात साऱ्यांवरती तु दिमाखात

मोहक क्षणभर, येतील कैक मायावी

तु साजरी गोजरी खरी तुझ्या कैफात

भले कळे ना कुणा लावण्याची भाषा

डोलता पदर तुझा जणू तरंग तळ्यात

सोज्ज्वळ, मादक, कधी भिन्न रुपात

खुलते रुप ललनेचे, खरोखर साडीत

https://marathikavita.co.in/marathi-shrungarik-kavita/t44512/new/#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon

 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, ९ सप्टेंबर, २०२३

दिल की बात

























बात थोडीसी क्या मै तुमसे करता हूँ
दिलों दिमाग से खिल खिल उठता हूँ

खो गई थी जो मुझ से कभी एकबार
लगता है ज़िन्दगी से आज मिलता हूँ

सोचकर भी जब इक मुलाकात न हुई
सपनों में चुपके से तुम्हें रोज देखता हूँ

जानकर अंजान रहना आदत कैसी?
लगता है बेवजह टूटे तारोंको छेडता हूँ

सच मानो या गलत? तुम्हारी है मर्जी
मै तो बस् अपने दिल की बात करता हूँ

https://marathikavita.co.in/hindi-kavita/t44382/new/#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

पाऊस सर्वांसाठी


























पाऊस सर्वांसाठी

शहारते तरारते अंग प्रत्यांग झाड झुडूप वेलींचे
सुख समाधान म्हणावे की भाग्य परस्पर भेटीचे

तापली त्रासलेली धरणी, जेव्हा ओलावून जाते
सुखावती पाने फुलं जशी दव थेंबाची भेट होते

गडगडती मेघ सावळे दाखवित साऱ्यांना भीती
येतांना कधीतरी करावा गोंधळ ही कसली नीती

वारा सैरभैर ओलेता उंडारतो गल्लीबोळांमधून
कोसळत्या पावसाला सुद्धा देतो सहज भंडावून

लपंडाव नभी अन् शहरात चाले विजेचा जोरात
कळेना जनतेला खरोखर वागते कोण तोऱ्यात?

असुदे कसेही, आम्ही सोसू काही काळ हा त्रास
सर्वांसाठी नेमाने, तु रे देवा, पाठवित जा पाऊस

https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t44172/new/#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३

मनाचा पसारा
































https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t44162/new/#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९