शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२६

ख़ामोशी की ज़ुबान

ख़ामोशी की ज़ुबान

ख़ामोशी की ज़ुबान समुंदर जैसी होती हैं
उपरी सतह पर शांत, अंदर गहरी होती हैं

कौन समझ पाया आजतक गहराई उसकी
जीतनी हो कोशिश,रेत उतनी फिसलती हैं

ज्वार भाटा वक्त वक्त का अनोखा बदलाव
मौजूदगी उसकी, मन मश्तिष्क हिलाती हैं

उंची उडान,मन की गहराई दोनों साथसाथ
दिगंत और क्षितिज दोनों एक बात होती हैं 

बहका लो, चाहें जीतना तुम अपने मनकों
प्रकृति का एक उसुल,वो सब समा लेती हैं

https://marathikavita.co.in/index.php?topic=93292.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२६

मी गेल्यावर

मी गेल्यावर 

श्वास मोकळा स्वकीय घेतील मी गेल्यावर
सरकारात नोंद एखादी होईल मी गेल्यावर

'बरा होता हो' हळूहळू कानात परस्परांच्या
प्रतिस्पर्धी काही, कुजबुजतील मी गेल्यावर

श्रोता हक्काचा गेला चुटपुटतील काही वेडे 
खंत एवढीच मात्र मागे राहील मी गेल्यावर 

भ्रम कोणता पाळू, काय होईल माझ्या मागे 
रहाटगाडे नक्की असेच चालेल मी गेल्यावर

नको तामझाम मुळी, न् अवडंबर हो कसले
होऊ देत, शांततेत सारेच खेळ मी गेल्यावर

वेगळे काय घडणार?रिक्त होता माझी जागा
नियम सृष्टीचा,नवा कुणी येईल मी गेल्यावर

https://marathikavita.co.in/index.php?topic=93127.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२६

सीख

सीख

अतीत और भविष्य के बीच
एक अदृश्य दरवाजा या फिर
एक धूंधलीसी दिवार होती है

अतीत और भविष्य कि आँच
सचेत रखकर हमें,दूसरी ओर
सुख दुखों का अनुभव देती है

अतीत और भविष्य कि जांच
अच्छे बुरे, दोनों ही समय पर
जीने का सही हुनर सिखाती है

https://marathikavita.co.in/index.php?topic=92475.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, २७ सप्टेंबर, २०२६

आसुसलेला

आसुसलेला

गर्दीत हरवला माणूस माझ्यातला
शोधतोय सर्वदूर, कुणा रे गवसला 

नक्कीच इंटरनेटच्या जाळ्यात या 
असेल तो अलगदपणे गुरफटलेला 

दूर दूर क्षितिजावर एक धूसर रेषा
स्पष्ट दर्शवते भेद आम्हा दोघातला 

एक अधांतरी हो नाहीच्या चक्रात 
दूसरा घट्ट धरून मातीला बसलेला 

अपूर्ण शोध, स्वतःचा न् अनंताचा
अखंड धडपड तरीही आसुसलेला

https://marathikavita.co.in/index.php?topic=92145.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२६

बेचैन २४०९२०२६ yq २३:३८:३९

बेचैन

इंतज़ार, बारिश और तुम
बूंद बूंद मे याद आते हो तुम!

हवा का झोंका, वो लहराती झड 
मानो, छूकर तन को जाते हो तुम!

हिचकोले लेता, इतराता छाता
जानबूझकर जैसे छेडते हो तुम!

चाहत भरा समा, सुहाना मौसम
इंतज़ार में बेचैन हम, कभी तुम!

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२६

चाल आणखी

चाल आणखी

थांबलास का? चाल आणखी थोडे अंतर
आधी बोल एकावर,बोल दुसरे थोडे नंतर

हातचलाखी न् काय काय करतात कोणी
जादू करतो काळी,कुणी मारतो थोडे मंतर

पावलागणिक गाणे नवे,येथे नव्या पिढीचे 
आमचेही चालू असते, मधेमधे थोडे जंतर

एआय असो वा आणखीन ते नवीन काही
वापरावे हटकून, जुनाट एखादे थोडे तंतर

आंदोलने भले नको न् नकोत कसले मोर्चे
अनुभवा तरी दिल्लीतले, थोडे जंतर-मंतर

जंतर (जुने वाद्य) तंतर (तंत्र)
https://marathikavita.co.in/index.php?topic=91722.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, ९ सप्टेंबर, २०२६

चर्चेअंती

चर्चेअंती

का न व्हावे, फिरून एक आपण
ठेवूयात का जरा,दूर इगो आपण

मान्य! आवेग,वेग आहे भावनांना 
घेवू त्यांना अलगद जाणून आपण

विचित्रच वाटेल, थोडा प्रश्न माझा
तरीही शोधू उत्तर, एखादे आपण

चार ऐकवं न् ऐक दोन, जमल्यास
एकमेकांचे ही थोडेसे ऐकू आपण

काय चूक आपलं, न् काय बरोबर
चर्चेअंती खरं खोटं ते ठरवू आपण

https://marathikavita.co.in/index.php?topic=90742.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२६

कर्तव्य न् सल्ला

कर्तव्य न् सल्ला

सर्वत्र एफ् डी ए च्या 
आता धाडी पडू लागल्या
कित्येक ठिकाणी हो
दुधाच्या नद्या वाहू लागल्या

जाणून कर्तव्ये कुणी 
नियमात कामे करतो आहे
सामान्य जरा सुखावता
महागाईचा भडका होत आहे

रंगुनी लाल रंगात
चायनीज सारेच हो रंगलेले
"तुका" म्हणे आता
भेसळहीन खाणे खरे चांगले

https://marathikavita.co.in/index.php?topic=89488.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, २६ ऑगस्ट, २०२६

आपलं जग २५०८२०२६ yq १६:४४:१४

आपलं जग

सगळं जग आपल वाटतं...
खरंच का हे बोलणं पटतं.? 

आभासी या स्वार्थी जगी
मोजकेच असावेत वाटतं.!

पहा शोधून,अवतीभोवती
खुल्या दृष्टीस कोण दिसतं!

एक एक दिसेल कैक रंगी
रंगाचं या,काही खरं नसतं!

प्रत्यक्षात, दिसतं ते नसतं
म्हणून अवघं जग फसतं!

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२६

आठवणी रेंगाळलेल्या

आठवणी रेंगाळलेल्या

आंबट, काही गोड भोगलेल्या
आठवणी, ह्रदयात कोरलेल्या

तरीही हवा नकोसा एक स्वाद 
जगण्याला, या देऊन गेलेल्या

तुमच्या,माझ्या आणि सर्वांच्या
स्मरणात कायमच्या बसलेल्या

अशाच कित्येक हव्या नकोशा
विसरु म्हणता,ठाम रूतलेल्या

प्रत्येकाच्याच मनात असतात
काही "आठवणी रेंगाळलेल्या"

https://marathikavita.co.in/index.php?topic=89428.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९