मराठी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५

रंग स्वप्न

रंग स्वप्न

डोळ्यात स्वप्न असतात...घेऊन कैक रंग 
उतरतात सत्यात काही,होतात काही भंग

सांडूनि रंग वर्ख..उरतात कित्येक माघारी
पाठलाग जीवनाचा करतात सारेच हे रंग

मिसळतात परस्परात मोजके ते पारदर्शी 
काहींच्या वाट्या असते, होणे स्वतःत दंग

त्यातल्यात्यात बरे स्वप्नां पुरताच खेळ हा 
सत्यात येता येता, टिकतील का यांचे ढंग

वाटते एक भिती अनामिक..रोज जागता 
अप्रत्यक्षपणे त्या, लागला माणसांचा संग

https://marathikavita.co.in/index.php?topic=65694.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९