प्रेम कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेम कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२५

नजारे किनारे























नजारे किनारे

नकोत हे नजारे नको चंद्र तारे
भावतात मला मोकळे किनारे

पायी खेळते मुक्त रेशीम वाळू 
मृदुल भास, अल्हाददायी सारे 

मंद स्पर्शातून, हळूवार छेडती
स्वरात वाहणारे, खोडील वारे

विसावा हा आतूरल्या जीवांचा 
भेटती येथे कैक अधीर बिचारे 

येथेच भेटते, क्षितिज गगनाला 
हवेत कशाला, डोईवरुन पहारे

आवडती मला, सागरी किनारे
नकोत चंद्र तारे, नको ते नजारे

https://marathikavita.co.in/index.php?topic=70004.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, १४ सप्टेंबर, २०२५

भास गोजिरा

भास गोजिरा

सखये भास तुझे भोवती का सारखे फिरावे
सावलीत न् कधी जळी प्रतिबिंबात दिसावे

बावरते वेळोवेळी, जसे वाऱ्यावरी फुल वेडे
बैचेन मन माझे का म्हणे भ्रमरा सम वागावे

छाया, पडछाया, अचानक कवडसे बिलोरी
धरु पाहता हाती सारेच का नजरेतून सुटावे

ओढ वेड्या मनाची, माझ्या आगळी वेगळी
जाणून सत्य ते, तुला सहज का न उमजावे

ठेवावी कुठवर मी आशा, भेट होण्या तुझी
विचार करता हसू, न् प्रत्यक्षात मी फसावे?

किती काळ जोपासू,भास हा मनी गोजिरा
भेट नसता समक्ष,जगण्या त्राण कसे उरावे

https://marathikavita.co.in/index.php?topic=64978.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९