गोष्ट आपली
कशी सांगू?तुझी माझी गोष्ट मी कुणाला
काय नाव देवू मी मग आपल्या नात्याला
बरं,दिलंच जर मी "प्रेम" हे नाव नात्याला
खरं सांग, सहज पटेल का तुझ्या मनाला
नातं धरती आकाशाचं, किनारा न् लाटेचं
असून ज्ञात, उमगलंय का खरं,ते कुणाला
खरंच, खरी असतात, अशी बेनामी नाती
हुरहूर,ओढ, आयुष्यभर लावतात मनाला
पटणार नाही हे सारं काही बहुदा जगाला
पण एकदा विचारुन बघ प्रश्न हा स्वतःला
https://marathikavita.co.in/index.php?topic=70760.new#new
©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा