चक्र वेळेचे
चुकले आडाखे सारे,उरले फक्त पसारे
उमजले ना चक्र वेळेचे, सत्य मात्र खरे
चावी जोवर, दौड तोवर कर्म काट्यांचे
स्थितप्रज्ञ कुठे,कुठे उंच, उंचीवर मनोरे
यंत्रवत अनुभवले बदल अनेक भोवती
भावनाशून्य गतीत फिरतात नित्य वारे
तास,मिनिट,सेकंद सर्व चक्राकार फेरा
थांबून योग्य स्थानी देती आपणां इशारे
वेळ टळते, वेळ थांबते, उंचीवरही नेते
तरी ही महत्त्व, विसरतात लोक बिचारे
https://marathikavita.co.in/index.php?topic=70942.new#new
©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा