प्रेरणादायी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेरणादायी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २६ ऑक्टोबर, २०२५

कलाकार २६१०२०२५ yq १७:१०:२५

कलाकार

तोवर हे असेच चालू राहणार...
जोवर, तिसरी घंटा वाजणार...

रंगमंचावरील ध्वनी प्रकाशात
कलाकार स्वतःला विसरणार...

चेहऱ्यावर, रंग लावल्यानंतर 
खुशाल स्वतःस झोकून देणार...

चाखतांना अभिनयाची गोडी
प्रेक्षकांना देखील तृप्त करणार...

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५

कारण

कारण
  

आनंदी व्हायला कारण कुठे लागते!
नाराज व्हायला कारण कुठे लागते!

झुळूक वाऱ्याची हळू स्पर्शून जाता 
कुणाला त्रासदायक का कुठे वाटते!

माझे तुझे अन् तुझे माझे, करतांना 
सौख्य खरे,अंतर्मनाला कुठे भासते?

अनिश्चित जीवन अल्पकाळ येथले
जाणण्या रात्रंदिन कुठे कुठे जागते!

म्हणा,गेला तो सुखाने, क्षण आला 
कवटाळून व्यथा,सुख कुठे लाभते!

https://marathikavita.co.in/index.php?topic=65304.new#new


©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, ३० मे, २०२५

ध्येय

ध्येय

तु एक मीही एक दोघं प्रवासी एका वाटेचे
माहीत नाही कुणाला गंतव्य कुठे कोणाचे

वाट सारी चाळलेली, तरी थोडी मळलेली
असून समांतर,तरी अंतर राहील कायमचे

लागलीच का थांबतो प्रवास खेळ इथला? 
हुशारीने दरवेळी आपले पाऊल टाकायचे

स्पर्धेच्या युगात नित्य रे अडथळे नियमांचे
पाळून अटी,शर्ती सर्व नेमके उत्तर द्यायचे

डाव प्रतीडाव खेळू दे, भले कुणी कितीही
तत्त्व प्रामाणिकतेचे, स्वतः नाही सोडायचे

म्हणो कुणी आहे कठीण वाटचाल इथली
लढून हिमतीने, तु ध्येय मनातले गाठायचे

https://marathikavita.co.in/index.php?topic=57119.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

गुरुवार, १० एप्रिल, २०२५

प्रयत्न तर कर

प्रयत्न तर कर

एकदा प्रयत्न तर कर...बघ चार शब्द मांडून 
मोकळं होईल मन तुझं बघ चार शब्द सांगून

कोंडलेल्या भावनांनी खरं त्रास होतो मनाला
चर्चा कर कुणाशी तरी, बघ चार शब्द बोलून

पानगळ होते शरदऋतूत पाहतो आपण सारे
आठव ऋतू तो बोलता,बघ चार शब्द टाळून

होताच कधी अपमान अवहेलना विनाकारण
खुशाल द्यावेत तोंडावर बघ चार शब्द मारून

करूनही चूक कुणी मागता प्रामाणिक माफी
क्षमा करताना बोलावेत बघ चार शब्द हासून

https://marathikavita.co.in/index.php?topic=54170.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९