ईतर कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ईतर कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २७ ऑक्टोबर, २०२५

क्षण क्षण

क्षण क्षण

चांगला क्षण, वाईट क्षण
येतो क्षण अन् जातो क्षण
तुम्ही कोणता हो निवडता क्षण?
क्षणा क्षणातलं हे आयुष्य
किती क्षण, जगतो खरे आपण?

हसरा क्षण, रडका क्षण
प्रत्येकाचा असतो दुखरा क्षण
समजून तुम्ही घेता कोणता क्षण?
क्षणभंगुर सारं जगतो मी
वाट्याचं तुमच्या घ्या चांगल जगून!

खरा क्षण नी खोटा क्षण
पावलोपावली तो दिसता क्षण
काय म्हणते मन? आनुभवता क्षण?
मी तर होतो सुन्न खुपदा
तुम्ही पण घ्या, योग्य निवडून क्षण!

ध्यानात क्षण,मनात क्षण
कर्मकांडात पण शोधतो क्षण
स्मरतो का समईतचा जळता क्षण?
सारे जगतो श्वासातला क्षण
खरोखर पहा एकदा विचार करून!

https://marathikavita.co.in/index.php?topic=69039.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, २ जून, २०२५

पानगळ ०२०६२०२५ yq ११:४३:५३

पानगळ

पानगळी सारखं
मन मोकळं झालं तर?
कदाचित दु:ख वाटेल 
काही काळ!
पण एक लक्षात येतं?
ते म्हणजे,
मन पुन्हा कोरं होईल!
नव्याने नाती बांधायला...
हळूवारपणे फुलायला,
जशी पालवी फुटते नव्याने,
काय वाटतं?

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९