शुक्रवार, २९ जून, २०१८

अफवा


http://marathikavita.co.in/preranadai-kavita/t30984/new/#new

झोकतो स्वतःला

झोकतो स्वतःला

गर्दीत माणसांच्या मी शोधतो स्वतःला
एकटेपणात कधी मी हरवतो स्वतःला

ओथंबता अनेक स्वप्ने डोळ्यात जेव्हा
हट्टानेच आरसा तो सजवतो स्वतःला

कष्टास सौख्य मानता सर्व हयात गेली
वेळी सुखाच्या नेमका विसरतो स्वतःला

बहाणा भेटण्याचा तो तसा खरा होता
जोपासण्या रे हित तुझे टाळतो स्वतःला

लेखू कमी कसा सांग माझ्या निंदकांना
यशात त्यांच्या सदैव ओवाळतो स्वतःला

मौनात सागराच्या पाताळ व्यापलेले
शोधता गवसते जेव्हा झोकतो स्वतःला

© शिवाजी सांगळे 🎭
 संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30971/new/#new

शुक्रवार, २२ जून, २०१८

सुर्यास्त


४८३/२२०६२०१८


आभाळ

४८२/२२०६२०१८

हायकू ३३३-३३५

#हायकू ३३५
विज कल्लोळ
धो धो पाऊस धारा
अतृप्त धरा २१-०६-२०१८

#हायकू ३३४

श्री सुरज पाटील (फेसबुक वरून)

#हायकू ३३३

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

रविवार, १७ जून, २०१८

त्या वळणावर...




http://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t30939/new/#new

फुंकर

४७८/१३०६२०१८


ड्रेसकोड

ड्रेसकोड

काय सांगू कुणाला कशाचे वेड आहे 
बोलणेही कुणा कुणाचे प्री पेड आहे 

फेसबुकवरच्या जत्रेतील नव्या जुन्यांना
चिमटे काढण्याची अतरंगी खोड आहे

मागताची कधी चुकून उधार कुणाकडे 
नाही म्हणती बंदे थोडीच मोड आहे 

म्हटले सरबराई करू जरा पाहुण्यांची 
कळले मंडळी सर्व आधीच लोड आहे 

जोखती एकदूसऱ्यास कपड्यावरुन हे 
पहा पाळताती हल्ली ड्रेसकोड आहे 

© शिवाजी सांगळे 🎭
 संपर्क:९५४५९७६५८९ 
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30931/new/#new

सोमवार, ११ जून, २०१८

हायकू ३३०-३३२

#हायकू ३३२

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू ३३१

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू ३३०

छायाचित्र सौजन्य: श्री मनोज बिंड

शेवटचं पान



मंगळवार, ५ जून, २०१८

माहोल



मर्म

मर्म

शरीर सुद्धा आहे एक बासरी
फुंकर घालतो अज्ञात मुरारी
शोधता जीवाने त्या दश दिशा
सापडे मर्म स्वतःच्या अंतरी ! 
©शिव
४७३/०५०६२०१८

हायकू ३२७-३२९

#हायकू ३२९

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू ३२८
कैरी चिरली
मसाल्यात घोळली
तोंडी लावली ०४-०६-२०१८

#हायकू ३२७
विज कडका
मेघ गहिवरला
रडू लागला ०१-०६-२०१८

सोमवार, ४ जून, २०१८

बकेट लिस्ट (हिन्दी)

बकेट लिस्ट

छोटी है उम्र
तो कहना जरूरी हैं...?
यह करना बकाया रहा...!
वह करना बकाया रहा...!
वैसे, जिंदगी में कुछ भी बकाया नहिं
बची हैं तो... अनगिनत इच्छाएं
बकाया हैँ... बहोतसे सपने
एकबार सहेज में उनकी सूची बनाई
ओर क्या?
उनकी एक बाल्टी भर गई
फिर भी एखाद रही
क्या, इच्छाएं पूरी होतीं हैं कभी?
ऐसी सूची बनाने पश्चात?
सूची बना सकता हूँ, मैं, अपनी,
परन्तु उस सूची का क्या?
जो पूरी करनी थी...मुझे
औरों ने निकाली हुई...
ओर
रखीं थी जो, मैंने पेंडिंग में...?

© शिवाजी सांगळे 🎭
 संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/hindi-kavita/t30865/new/#new

नफा तोटा

नफा तोटा

नाही फरक राहिलो जरी तोट्याला
झिडकारतो भोवतालच्या खोट्याला

सारेच इतके हतबल आम्ही झालो 
घेतो इंधन झेपत नसता खिशाला

आसपास असता जगणे महाग जरी
मरतो बळी फुकट विचारा मृत्यूला

मुजोरीच वाढली इतकी जिथे तिथे
उरलाय का वचक कानुनी सोट्याला

विकास बसला रूसून वेशीवरती
नाही हो फुरसत आमच्या दौऱ्याला

मांडतोय खरी गोष्ट इथे मनातली
जाव लागो भले कुणाच्या रोषाला

© शिवाजी सांगळे 🎭
 संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30896/new/#new

खरे खोटे

खरे खोटे

सोसले दु:ख छोटे होते
भेटले सर्व खोटे होते

थोक खरेदी करण्या गेलो
विक्रीस तेथे वाटे होते

करू म्हणताच एकत्र चर्चा
फुटले तिजला फाटे होते 

म्हटल शिकावं चोरी करणं
त्यातही फार तोटे होते

उरकण्या काम ते सरकारी
घातले खूप खेटे होते 
(मात्रा वृत्त : पादाकुलक ८+८)
© शिवाजी सांगळे 🎭
 संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30889/new/#new

वेळ

वेळ
"भासा भासाचा खेळ" हा
आत्म्या परमात्म्याचा मेळ
जाणतो ते रूप परमेशाचे
शोधण्यास दवडतो वेळ !
४७२/०२०६२०१८

शुक्रवार, १ जून, २०१८

भुल


४७१/३१०५२०१८
चित्र सौजन्य : गुगल

शिडकावा

शिडकावा
तुझ्या रे शिडकाव्याने 
काल भलताच घोळ केला,
बेसावध मी असताना
तीच्या संगतीचा भास झाला !
४७०/२९०५२०१८

हायकू ३२४-३२६

#हायकू ३२६

छायाचित्र सौजन्य: श्री मनोज बिंड

#हायकू ३२५

छायाचित्र सौजन्य: श्री मनोज बिंड

#हायकू ३२४

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर