भक्ती कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भक्ती कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०२३

हर हर महादेव














https://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/t41699/new/#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon

 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२

आदिमाया आदिशक्ती

आदिमाया आदिशक्ती

आदिमाया आदिशक्ती तुच जननी साऱ्यांची
तुझ्या दारी घेऊन आलो एक वारी भक्तीची |धृ|

नवदुर्गा गायत्री अंम्बा तु चामुंडा इंद्राणी
फरसाधारणी काली तु शीतला नारायणी
उमा जगदंबा आई भवानी त्रिपुरासुंदरी
कात्यायनी लक्ष्मी असो कृपा आम्हावरी
जागर करु नवरात्रीचा इच्छा सगळ्यांची |१|
आदिमाया आदिशक्ती तुच जननी साऱ्यांची

नऊ रुपे नित्य नवी तुझीच गे माऊली
सदा राहूदे आम्हांवरी कृपेची सावली
शक्तीपीठे साडेतीन जागृत तुझी आई
झुकवितो मी श्रद्धेने माथा तुझेच पायी
कृपादृष्टी राहो मजवरी प्रार्थना ही भक्ताची |२|
आदिमाया आदिशक्ती तुच जननी साऱ्यांची

दैत्य संहारक महामाया भक्ताना पावक
तन मन धनाने होऊ पाही तुझाच सेवक
ॐकारणी एकरूपी वैष्णवी तु ग वराही
ठेव माथी भक्ता वरदहस्त कृपाळू पाही
ऐकावी माते हाक आर्त आम्हा सर्व भक्तांची |३|
आदिमाया आदिशक्ती तुच जननी साऱ्यांची

https://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/t38686/msg80143/#msg80143
©शिवाजी सांगळे 🦋papillon
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, १६ जुलै, २०२२

मोरया मोरया

मोरया मोरया 🌺

तू सुखकर्ता, बाप्पा तू दु:खहर्ता
सकलांचा तू भाग्यविधाता
गणपती बाप्पा तु विद्यादाता
लंबोदरा रे तू दु:खहर्ता

मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया
मोरया मोरया मंगल मुर्ती मोरया

गुणी जणांचा तू भवतारक
बुध्दी दाता न् वरदविनायक 
तुझ्या कृपेचे आम्ही याचक
दीनदुबळ्यांचा दु:ख निवारक
सावरण्या सर्व कष्ट भोवतीचे 
आशीर्वाद तुझा मिळू दे आता

मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया
मोरया मोरया मंगल मुर्ती मोरया

प्रात:काली घडो तुझेच स्मरण
ध्यानाने तुझीया उजळो हे जीवन
चरणी तुझ्या रे मी नित्य शरण
अवघे सरू दे माझे मी पण
विनंती एक तुला माझी एकदंता
मुखी राहू दे तुझेच नाम आता

मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया
मोरया मोरया मंगल मुर्ती मोरया

https://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/t37483/new/#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, १० जुलै, २०२२

सफळ साध्य १००७२०२२ १८:३९




























इथवर आलो पांडुरंगा तुझ्यासाठी
दर्शन द्यावे नम्र झालो तुझ्याठायी

नजर मात्र दर्शनाने तुझ्या रे देवा
माझी होई सफळ साध्य पुण्याई

©शिवाजी सांगळे 🦋papillon
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९


भव-सागरी प्राप्त होता सर्व सुखे 
परी अपुर्णत्व तुजविण ग विठाई

मोक्षाला कारक होतसे नाम तुझे
समाधान प्रचिती येते ठायी ठायी

वारी निमित्त होतो भक्त समागम
सानथोर भक्त धन्य हो तुज पायी

बुधवार, ६ एप्रिल, २०२२

तुज दारी

तुज दारी

श्वास चाले कानी पडता किर्तन अभंग
विसरुन देहभान होतो मी तुज दारी दंग...धृ

एकएक शब्द रुजवी अंतरात ज्ञान
मोह माया विसरतो सारा अभिमान
देतो भक्तीची सर्वां खरी खुरी जाण
टाळ, मृदंग सोबतीने आगळाच रंग...१

श्वास चाले कानी पडता किर्तन अभंग

साऱ्या सान थोरां अखंड तुझी ओढ
भाव भोळी भक्ती आम्हा मनात वेड
आषाढी कार्तिकीला पुरवतोस लाड
वर्षभर पुरतो आम्हा तुझा अल्प संग...२

श्वास चाले कानी पडता किर्तन अभंग

https://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/t36865/new/#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, १२ डिसेंबर, २०२१

पालखी साईची

पालखी साईची

निघाली पालखी, पालखी पायी शिर्डीला

आतुर झाला, झाला भक्त साई भेटीला ||धृ||


घेऊन ध्वज हाती, मुखी नाम साई

दूर दूर वाट अखंड चालतोय पायी

उनवारा सोशीत ऐसा भक्त चालला

मान देऊनी अवघ्या श्रद्धा सबुरीला

आतुर झाला, झाला भक्त साई भेटीला ||१||


सर्वधर्म समभाव जीथे जपतो साई

अहोरात्र धुनी तेवते, ती द्वारकामाई

म्हणती सुखाने त्यांना मोक्ष लाभला

पुण्यभूमीत येता भक्त भरून पावला

आतुर झाला, झाला भक्त साई भेटीला ||२||


सांगूनी मंत्र गेले 'सबका मालिक एक'

नाही दुजे रामरहिम आहेत दोन्ही एक

श्रध्दाळूंच्या श्रद्धेला जो नेहमी पावला

ऐसा साईराम भक्तांना शिर्डीत गावला

आतुर झाला, झाला भक्त साई भेटीला ||३||


चालली पालखी, पालखी पायी शिर्डीला

आतुर झाला, झाला भक्त साई भेटीला ||धृ||

https://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/t35101/new/#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon

 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१

विठ्ठला विठ्ठला

विठ्ठला विठ्ठला

ओढ दर्शनाची लागली आम्हाला

विठ्ठला विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला ||धृ||


निजरुप भाबडे आमच्या मनात

आस तुज भेटीची दाटली उरात

भेटशील आम्हा कधी तु कृपाळा

झालाय जीव अवघा आतुरलेला

ओढ दर्शनाची लागली आम्हाला ||१||


विसरलो संसार असा प्रेम ओढा

चाले भक्ती तांडा पायी वाट वेडा

टाळ मृदंग, कपाळी अबीर टीळा

हाती पताका, गळी तुलसी माला

ओढ दर्शनाची लागली आम्हाला ||२||


ज्ञान भक्तीयोग देवाजी तुज ठायी

ठेऊ दे एकवार माथा तुझ्या पायी

व्हावे सार्थक येऊनी या जन्माला

लाभो मोक्ष माझ्या नश्वर जीवाला

ओढ दर्शनाची लागली आम्हाला ||३||

विठ्ठला विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला

https://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/t34075/new/#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon

 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१

आतुरता आगमनाची
















https://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/t33920/msg75332/#msg75332

©शिवाजी सांगळे 🦋papillon

 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, २१ जुलै, २०२१

भुक दर्शनाची


















https://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/t33450/new/#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon

 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, १६ जुलै, २०२१

आनंद रंग

















https://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/t33423/new/#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon

संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, ११ जून, २०२०

सुन्या वाटा

सुन्या वाटा

ओढ पंढरीची | आस देवाजीची |
सकल भक्तानां | आराध्याची ||

सुन्या यंदा वाटा | हरवल्या आशा |
झाकोळल्या दिशा | भोवताली ||

मृदंग तो गप्प | झाला टाळ मुका |
केशरी पताका | स्तब्ध झाली ||

काळजी भक्तांची | प्रत्यक्ष विठूला |
त्या चंद्रभागेला | लागली बा ||

हिरावला गेला | सुखाचा हा ठेवा |
जाणतो तु देवा | आत्म भाव ||

चुकावी का वारी | प्रश्न भक्ता मनी |
पांडुरंग ज्ञानी | शिवा म्हणे ||

©शिवाजी सांगळे 🦋
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
https://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/t32641/new/#new

बुधवार, ३ जून, २०२०

जाण

जाण

वारीस जाण्याची | परंपरा थोर |
सर्वा जीवा घोर | लागलासे ||

उभा विटेवरी | लावूनीया डोळा |
भक्तांसाठी भोळा | पांडुरंग ||

प्रतिक्षेत तुम्ही | ठावे आम्हा देवा |
कसा घेवू धावा | उमजेना ||

घडले आक्रीत | दोघेही व्याकूळ |
मनी हळ हळ | भेटायासी ||

कैसे हे संकट | देवा तुची जाणे |
कोण कुठे उणे | पडला का ||

भेट व्हावी कशी | हरीची भक्तांशी |
गाठ कोरोनाशी | आहे देवा ||

सर्वज्ञानी एक | त्रिभुवन ज्ञाता |
जाण द्यावी भक्तां | म्हणे शिवा ||

https://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/t32614/new/#new

©शिवाजी सांगळे 🦋
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, ३१ डिसेंबर, २०१८

वहिवाट

वहिवाट

वाट्यास आलेला । क्षण रम्य व्हावा ।
जन्म तो सरावा । सेवेसाठी ।।

सामोरी जो येता । क्षण ते मोहाचे । 
भान हो जनाचे । मनी राहो ।।

विसरूनी सेवा । जनहिता वेळी ।
आपुलीच पोळी । भाजू नये ।।

अवलंबू नये । स्वार्थ लोभ नीती । 
विस्कटून नाती । इहलोकी ।।

काळाचीच रीत । व्यवहारी भ्रष्ट । 
अंती करी नष्ट । ध्यानी असो ।।

कोण नित्य येथे । थांबावया आले ।
जाणे ठरलेले । माघारीचे ।।

ऐसी वहिवाट । आहे या युगाची । 
हाक वास्तवाची । ऐक शिवा ।।

© शिवाजी सांगळे 🎭
मो. ९५४५९७६५८९

http://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/t31465/new/#new