रविवार, २१ जुलै, २०२४

शेगावचे संत गजानन

























शेगावचे संत गजानन

शेगावीच्या थोर संताचे दर्शन मज झाले
दुख भय मज मनीचे दूर की हो गेले

आजाणूबाहू, उंच सडसडीत काया
प्रकटली मूर्ती घेऊन भक्तीचा पाया
दिगंबरावस्थेत सामान्यांच्या दृष्टीस पडले..१ 

वस्त्र लालसा न् पादत्राणे टाळूनी
शुद्ध ब्रह्म नित्य चालले अनवाणी
जीवनमुक्तांस देहाचे तेव्हा भान ना राहिले..२

कर्म, भक्ती आणखी योगमार्गाने
प्राप्त होई आत्मज्ञान ते सर्वार्थाने
वेळोवेळी ज्ञान देऊनी लोकांना शिकविले..३

गण गण गणात बोते मंत्र सांगूनी
नेक वाट भक्तां सन्मार्गाची दावूनी
ऋषिपंचमी पुण्यदिवशी चैतन्य हे लोपले..४

https://marathikavita.co.in/index.php?topic=45269.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा