शुक्रवार, २९ एप्रिल, २०१६

दे धक्क्का...! स्टाँक

दे धक्का...!

स्टाँक

मद्ध्य  निर्मिती उद्ध्योगांना
पाणी कपात लागली आहे,
उत्पादनावर याचा परिणाम
नक्की चांगला होणार आहे !

या आधीच विजय मल्ल्या
परदेशी निघुन गेलेला आहे,
मद्धपींनो व्हा अँलर्ट आता
स्टाँकची सोय करायची आहे !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-23545/new/#new

मोठेपण...


दे धक्का...! वळण

दे धक्का...!

वळण

उस गोड लागला तर
मुळा पर्यंत खाल्ला जातो,
माती नरम असली कि
कोपराने खड्डा खणला जातो!

ऐकुन घेतात त्यांच्याकडे 
कुणी काहीही बोलत सुटतात,
कडवा विरोध झाला, कि
मोर्चे दुसरीकडे वळवले जातात !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-23560/new/#new

गुरुवार, २८ एप्रिल, २०१६

अपघातांची गर्दी

अपघातांची गर्दी

        देशभरात होणारे रेल्वे अपघात आपल्याला काही नविन नाहीत, त्याही पेक्षा ते नित्याचेच झालेत हे खरे. परंतु दि.२८ नोव्हेबर पासुन उपनगरीय लोकल मधील गर्दी मुळे चालत्या गाडीतून पडून सुरू झालेले अपघाती मृत्यु सत्र अजुनही थांबलेले नाही, हया अपघातात जवळपास सहा दिवसात सात बळी गेले काही गंभीर जखमी झाले आहेत.

        अपघातात नाहक बळी गेले याच्यावर आता चर्चासत्रे झडु लागलीत, प्रत्येक जण आपली मतं कशी योग्य आहेत हे पटवुन देण्याच्या स्पर्धेत आहे,  काही प्रवाशांचे बाईट्स घेतले गेले, त्यातील काही रास्त होत, व बरेचसे मागण्यांचे पाढे वाचणारे होते, नुसतेच लचके तोडणारे! 

       रेल्वे, खास करून उपनगरी लोकल च्या गर्दीचा खरा प्रश्न व्यवस्थितपणे सुटावा या साठी एवढ्या सा-या चर्चां मधुन मुळ समस्येचा काहीच विचार झालेला नाही. केवळ ताप्तपुरत्या उपाय योजनांचा विचार केला गेला असे वाटते, कोण म्हणे डब्यांची संख्या पंधरा करा, प्लँटफाँर्मची उंची वाढवा,  दरवाजा अडविणा-यां लोकांचा बंदोबस्त करा, बंद दरवाज्याच्या लोकल सुरू करा वगैरे महत्वाचे मुद्धे व त्यावर अनेक उपाय सुचविले गेले.

       पहिला मुद्दा, डब्यांची संख्या पंधरा करून नक्की प्रश्न सुटेल? कारण पुर्वी डब्यांची संख्या नऊ होती, ती वाढवुन बारा केली, काय फरक पडला? काही दिवस ठीक ठाक, पुन्हा पहिले पाढे पंच्चावन, कारण प्रवासी संख्या वाढली, कोण प्रवासी आले, कसे वाढले हा विषय वेगळा, मुळ प्रश्न हा कि दोन्ही उपनगरातुन, अगदि विरार ते कर्जत खोपोली पासुनचा कर्मचारी वर्ग कल्याणच्या पुढे फक्त दक्षिण मुंबईकडे येतो, त्या अगोदर काही ठाणे, घाटकोपर व दादरला उतरतो, तरीही गर्दी कमी होत नाही, याचे एकमेव कारण म्हणजे अनेक कार्यालयांच विकेंद्रीकरण झालेल नाही. काही कारणां मुळे ते शक्यही नसेल तरी सर्वच बँकाची, राज्य शासनाची बरीच कार्यालये रेल्वे लगतच्या जवळील गावांमधे, तालुक्यांमधे आहेत, तर अशा भागातील कर्मचा-याना प्रशासनिक हरकती नसतील व सोयी असतील तर, त्यांच्या राहत्या ठीकाणाच्या जवळपास पोस्टींग दिली तर काही अंशी अशा प्रवाश्यांचा दूरचा प्रवास कमी होईल अन् याचा गर्दी कमी होण्यास काही अंशी तरी नक्कीच परीणाम होईल. आणखी एक महत्वाची बाब ती म्हणजे दिड ते दोन तासाच्या ह्या सर्व प्रवासा साठी मध्य व पश्चिम रेल्वेच्या तोडीचा दुसरा जलद व थेट पर्यायी मार्गच नाही.

         दुसरा मुद्दा, मला आठवतय कि पुर्वी रस्त्यांची जी दुरूस्ती कामे होत, तेंव्हा रस्त्यांना ड्रील करून, म्हणजे त्यावरील डांबराचा थर काढुन नविन थर चढविला जायचा, त्यामुळे नवा रस्ता अगोदरच्याच उंचीचा रहायचा. हे उदाहरण अशासाठी कि हल्ली असे पाहण्यात येते कि सर्व स्टेशनांवर प्लँटफाँर्मची उंची कमी कमी होत आहे, वरील उदाहरणाचा विचार करता अस लक्षात येते कि रेल्वे रूळांमधे ज्या वेळी नविन खडी टाकली जाते तेव्हा रूळांमधे असलेली जुनी खडी व त्याची झालेली माती काढायला हवी, जेणे करून नवी खडी टाकल्या नंतर प्लँटफाँर्मची उंची पुर्ववत राहील. मान्य कि रेल्वेच्या व्यस्त शेड्युल मध्ये हे कितपत शक्य आहे, परंतु हयाच कारणा मुळे प्लँटफाँर्मची उंची वाढत चालली आहे, आणि प्लँटफाँर्म व छत यातील अंतर कमी होताना दिसते, याचा आणखी एक परीणाम म्हणजे ओव्हर हेड वायरला पेंटोग्राफ अडकून होणारे नुकसान व होणारा वाहतुकीचा खोळंबा. या पैलुवर किती जाणकारांचे लक्ष आहे कुणास ठाऊक? 

      तीसरा मुद्दा, दरवाजा अडविणा-यां लोकांचा बंदोबस्त करायला हवा हे बरोबरच आहे, पण तरीही एक प्रश्न मनात निर्माण होतो, तो असा कि हे लोक दारात का उभे रहातात? उत्तर सोपे आहे डब्यात बसायला, हवा यायला पुरेशी जागाच नाही. हल्ली नवीन रेक आलेले आहेत तरीही गर्दी तशीच आहे. काही हौशी प्रवासी करतात असे उपद्व्याप, त्याच्यावर लक्ष ठेउन कार्यवाही करता येउ शकते, त्यांचे प्रबोधन करता येउ शकते, स्टेशन वरील सी सी टिव्हींचा उपयोग करून अशा विघ्न संतोषी प्रवाश्यांना समज देता येउ शकते.

      चौथा मुद्दा, बंद दरवाज्याच्या लोकल आणणे हा पर्याय तसा होण-या गर्दीचा विचार करता फोल ठरेल, या अगोदर पश्चिम रेल्वेवर हा प्रयोग फसलेला आहे. मुळातच आपली मानसिकता शिस्तीची नाही, कारण साधं रांगेतुन या म्हटल तर कीती लोक ऐकतात? मान्य कि काही खाजगी क्षेत्रात/ ठीकाणी रांगा व्यवस्थित लागतात पण ती संख्या बोटावर मोजता येईल इतकीच आहे. 

      मुळात ही जबाबदारी प्रवाश्यासह सर्वांचीच आहे, प्रवाशांनी शिस्तीने, संयमाने व नियम पाळुन वागायला हवं सर्वाचा प्रवास सुखकर कसा होईल याचा विचार करायला हवा. वाढते नागरीकरण व वाढणारे लोंढे याला तरी काही पर्याय नाही फक्त सुरक्षित प्रवास करणे आपल्या हाती आहे हे नक्की.

© शिवाजी सांगळे

सुरवात...

सुरवात...

आज नविन काही शिकायला मिळालं,
नवा ब्लाँग तयार केला,
एक नवा अध्याय सुरू करतोय,
आपल्र्या सारख्या रसिकांचे
सहकार्य हवं आहे,
माझं लिखाणं आवडलं तर
तुम्हा कडून वाह वाह मला आवडेल,
जर चुकुन कुणाचं मन दुखावलं गेलं तर
मला जरूर सांगा,
चुकां मधुनच माणुस शिकतो ना?

=शिव