बुधवार, ३१ जानेवारी, २०१८

मला वाटते... चलती रहे जिंदगी...

मला वाटते... चलती रहे जिंदगी...

लांबच्या प्रवासात ट्रेनमधे दरवाज्या जवळच्या बर्थवर झोपणं म्हणजे पाळण्यात झोपल्याचं सुख, एकाच वेळी झोक्या सोबत लयबद्ध तालातली ट्रेनच्या आवाजातली अंगाई ऐकू येत होती, छान झोप लागलेली असताना आधेमधेच कुणीतरी खट्याळाने झोक्याला मुद्दाम धक्का दिल्या सारखे आचके सुद्धा बसत होते.

कुठेशी गाडी थांबली होती, झोप चाळवली अंगावरल्या जाड उबदार ब्लँकेट मधून हात बाहेर काढून घड्याळात किती वाजले हे पहायला सुद्धा मन होत नव्हतं, इतकं छान उबदार वाटत होतं, तरीही झोप लागत नव्हती...

किती वेगळे विचार येतात नाही मनात? एकांतात असताना? मला तर असा मस्त प्रवास आवडतो, आणि म्हणावसं वाटतं "हम भी चले, तुम भी चलो, चलती रहे जिंदगी...

=शिवाजी सांगळे, ग्वालियर (म.प्र.)

हायकू २६१-२६३

#हायकू २६३
सावळी सांज
भेटीस रात्र आली
गडद झाली ३०-०१-२०१८

#हायकू २६२
सुर्य अस्ताला
दूर दूर सावल्या
गारवा आला ३०-०१-२०१८

#हायकू २६१
काळा कातळ
उभा जळी नितळ
ध्यान लावून २७-०१-२०१८

©शिव

शुक्रवार, २६ जानेवारी, २०१८

हायकू २५८-२६०

#हायकू २६०
एक दिवस
नकोच देशभक्ती
खोटी आसक्ती २६-०१-२०१८

#हायकू २५९
पाऊस थेंब
पागोळीत थांबले
लोलक झाले २५-०१-२०१८

#हायकू २५८
पाझरे उन
ते गवाक्षा मधूनी 
धुंद कवडसे २२-०१-२०१८

#शिव ©

मंगळवार, २३ जानेवारी, २०१८

हायकू २५५-२५७

#हायकू २५७

छायाचित्र सौजन्य: गुगल

#हायकू २५६

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू २५५ 

छायाचित्र सौजन्य: श्री शहाजी धेंडे

गुरुवार, १८ जानेवारी, २०१८

सपान

सपान

दाटलं रं काळोख, शहारेल भुई
उजेडा संगतीनं,  कडाडेल ईज,
गार वाऱ्या तवा, वाटल आपरुप  
फुटताच भूईपोटी, कवळं बीज !

होतील गोळा, तवा रंगीत पाखरं
राना रानात मग, उधळतील दाणं,
भरल्या पोटानी, ते फिरता वावर
गातील गळाभर, कौतुकाचं गाणं !

रंगवाया सपान, तुज येणं जरुरी
होऊदे पावसा, बा तुझे उपकार
मिटव तहान कोरड्या धरणीची
नदी नाल्यां पाणी, मिळो भरपूर !

© शिवाजी सांगळे 🎭 
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30241/new/#new

शुक्रवार, ५ जानेवारी, २०१८

भान मनाचे


छायाचित्र सौजन्य: गुगल
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30173/new/#new

हायकू २५२-२५४

#हायकू २५४

छायाचित्र सौजन्य: गुगल

#हायकू २५३

छायाचित्र सौजन्य: श्री शिवाजी सांगळे

#हायकू २५२

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर