विडंबन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विडंबन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २८ डिसेंबर, २०२३

पाणीपुरी















पाणीपुरी

"मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे"
ठाव मजला आवडे तुज पाणीपुरी खाणे

जाता पुरी मुखात, मुखी दाह का व्हावा
मिटताच ओठ, आस्वाद खरा समजावा
व्यर्थ ठरते येथे दूसरे काही विचारणे...

हाती पुरी गोल ज्याच्या त्याने का थांबावे
ज्याने न चाखली कधी, त्या कसे उमजावे
फस्त करीत पुऱ्या, ते समाधिस्त होणे...

दिसता कधी समोरी तो रंगबिरंगी ठेला
लगेच सुटे मुखी पाणी न् येतसे तजेला
मनी एक विचार फक्त पाणीपुरी खाणे...

 https://marathikavita.co.in/index.php?topic=45228.msg86749#msg86749

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, १५ नोव्हेंबर, २०१७

तंत्रज्ञान गाथा

तंत्रज्ञान गाथा

अती नेट युगी, होईलच माती !
करावा तो किती, अट्टाहास !!

फेसबुक चँट, ते वाँट्स अँप !
येवु न दे झोप, कुणालाही !!

रात्रंदिन घोर, लाईक कमेंट !
लागे पुर्ण वाट, तब्येतीची !!

निशाचर वारी, कधी तरी बरी !
सकलां विचारी, सुख दु:ख !!

अखंडित डेटा, सर्वांचीच व्यथा !
तंत्रज्ञान गाथा, वदे शिवा !!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/vidamban-kavita/t29851/new/#new

शुक्रवार, ९ जून, २०१७

सांगून टाळणे अन् टाळून ते जाणे

सांगून टाळणे अन् टाळून ते जाणे
मी जाणून आहे पक्का तुला शहाणे

घेवुनी इथे मी फ्रँक्चर पाय माझा
अशा प्रसंगी का विचार यावा तुझा
टाळता न टळले इस्पितळात जाणे ।

क्रोध येतो मला तुला कसे कळावे
वांछित तुज होतो तेही ना उमजावे
ठरवून सुध्दा भेट झाले न तुझे येणे ।

स्मरता कधी तुला हे दुःख दूर होते
राहूनी मौन स्वतःला सावरले होते
धरावी न अपेक्षा असे मनात येणे ।

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/vidamban-kavita/t28769/new/#new

गुरुवार, ९ मार्च, २०१७

मोबाईल मधुन सुटती

मोबाईल मधुन सुटती

मोेबाईल मधुन सुटती
कविता, लेख अपार,
त्वरीत ट्याग करताती
फेसबुकचे वीर हे फार...

असता तुम्ही अॅक्टीव
लिहिता देखिल भरीव
दाविता आपला स्वभाव
उचलुनी फायदे ते फार...

करूनी विनंत्या थकता
वैेतागुनीही तुम्ही जाता
काहीच फरक न होता
ते ट्यागच करती फार...

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/vidamban-kavita/t27683/new/#new

रविवार, २२ जानेवारी, २०१७

मी ट्याँग कर, ट्याँग कर

वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा

मी डोलकर डोलकर, डोलकर दर्याचा राजा घर पान्यावरी बंदराला करतो ये जा!
च्या चालीवर....
(गीतकार शांता शेळके यांची क्षमा मागुन)

ट्याँगलो रे ट्याँगलो रे, बघ कि जरा तू मित्रा

मी ट्याँग कर, ट्याँग कर
ट्याँग कर, फेसबुकचा हाय चाप्टरं
पक्का नेटकरी, करतोय फेसबुकच्या वार्‍या

सर्वांचा लाडका समजतो स्वःताला भारी
लिहून कायपणबी मारतोय तुमच्या शीरी
माझ्या डोक्यान रे आहेत खुपच आयड्या
टाकता फेसबुकवर पडत्यात लगीच उड्या
मित्र नेटवर खोेर्‍यावानी
वाचत्यात आवडीनं गाणी
फेसबुकची हाये कहाणी
रोज तूमच्या पण वारतील बघा कि फेर्‍या

या गो फेसबुकचा, फेसबुकचा पसारा मोठा
कवा वाँलवरशी देतो मालपण खोटा
कवा देताव वादाचे विषय सोरू
कवा टेंन्शनची कमेंट देताे मारू
लाईक पाहून मना ये भरती
बसतो विश्वास त्यांच्या‌ वरती
उरतं मनविमान सोडून धरती
करत्यात वाँलवरती कमेंट पोरी सार्‍या

भल्या सकाळीच मोबाईल घेतोय हाती
पोस्ट आपल्या अपाँप टाकल्या जाती
न् मी लिवत बगा सुटतोय किती
दुकती बोट पण लिवून जास्ती
डोळे बी बघुन दमुन जाती
लिवायचं लिवुन लिवुन किती
तरी पण फारच मजा कि येती
देतो वाचाया नविन गोस्टी मी सार्‍या

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/vidamban-kavita/t27014/new/#new

गुरुवार, २२ डिसेंबर, २०१६

हाव सुटता सुटेना

हाव सुटता सुटेना

मी बोलावे तू गप्प व्हावे 
गोष्ट माझी कधी त्वा कळेना
अंतरीचे गुपीत माझ्या
कधीच तूजला ते उमजोना

मला वाटे नित्य नवल
गुंतलो गेलो कसे या बंधना
रोज राडे थोडे थोडे
संपवावे कसे मला कळेना

आस तुमच्या या घराची
सोडू म्हणता कशी ती सुटेना
हाव भुकेल्या या जीवाची
भागवावी म्हणता का भागेना
© शिवाजी सांगळे 

भेट तुझी माझी...

भेट तुझी माझी...

भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची
एसी युक्त हॉटेल होते गर्दीहि ती लोकांची

प्रखर उजेड नव्हता तेथे, कसलाच न पसारा
आनंदात होते सारे, आनंदची होता सारा
मला मुळी नव्हती चिंता, होणाऱ्या खर्चाची

हाती घेऊन दोन ग्लास, अदबीनं वेटर आला
वाकुनिया कमरेमध्ये, काय आणु असे म्हणाला
लागलीच ऑर्डर दिली, आण प्लेट समोस्याची

केसांमध्ये फुले होती, गालावरी तुझ्या लाली
पाहून रूप तुझे, येई स्मित माझ्या गाली
श्वासालाही ओढ होती आपल्याच स्पर्शाची

घेऊन अलगद आपण, हातामध्ये आपुलेच हात
हलकेच ठेऊन बिल, वेटरचाही गेला हात
खुप वेळ आता झाली, शपथ पुन्हा येण्याची 

© शिवाजी सांगळे 

शनिवार, १३ ऑगस्ट, २०१६

प्रभु तू कृपाळु...

"प्रभु तु दयाळू, कृपावंत दाता" या मुळ गाण्याचे विडंबन, गीतकार श्री उमाकांत काणेकर यांची क्षमा मागुन...

प्रभु तू कृपाळु...

प्रभु तु कृपाळु, रेल्वे मंत्री मोठा
वेळेवरी सोड तूच गाड्या आता!

कामधंद्या जाण्या दिली रेल गाडी
जाता येता काढे आमुची ती खोडी
प्रवासा नसे रे दुजा मार्ग आता...

तुझ्या गाड्यांमधे नसता सोई फार
करीतो प्रवास इथला लहान थोर
ऐकूनी सतत अनाउंन्समेंट बाता...

आम्हा प्रवाश्यांना सुख काय ठावे
मजबुरी मुळेच लागे स्टेशना यावे
अन्य कुठे जावे तुच सांग आता...

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/vidamban-kavita/t24993/new/#new