भेट तुझी माझी...
भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची
एसी युक्त हॉटेल होते गर्दीहि ती
लोकांची
प्रखर उजेड नव्हता तेथे, कसलाच न पसारा
आनंदात होते सारे, आनंदची होता सारा
मला मुळी नव्हती चिंता, होणाऱ्या
खर्चाची
हाती घेऊन दोन ग्लास, अदबीनं वेटर आला
वाकुनिया कमरेमध्ये, काय आणु असे
म्हणाला
लागलीच ऑर्डर दिली, आण प्लेट समोस्याची
केसांमध्ये फुले होती, गालावरी तुझ्या
लाली
पाहून रूप तुझे, येई स्मित माझ्या गाली
श्वासालाही ओढ होती आपल्याच स्पर्शाची
घेऊन अलगद आपण, हातामध्ये आपुलेच हात
हलकेच ठेऊन बिल, वेटरचाही गेला हात
खुप वेळ आता झाली, शपथ पुन्हा येण्याची
© शिवाजी सांगळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा