रविवार, ४ डिसेंबर, २०१६

कंदिल


कंदिल

लाईट नसलेल्या गावात...
गुरं परतीच्या सांजेला
नाजुक कापर्‍या हाताने
फुई आजी राखेने
लख्ख काच पुसायची
कंदिल प्रकाशात पार
उजळून जायची पडवी
गुरांच्या स्वासांचा...,
घंटाचा नाद घुमु लागे...
तोवर कुणी घोंगडी अंथरे,
मधोमध कंदिल
आजीेच्या पुढ्यात हरीपाठ
कोंडाळ करून आम्ही मुलं,
"देवाचीये द्वारी..." पासुन
"आरती ज्ञानराजा..." पर्यंत
गोड समाधी, भारणारी
शेवट... साखर शेंगदाण्याचा
मिठाई पेक्षा, गोड प्रसाद
आता विज आली अन्
हरीपाठ... हरवला...
आजी संगे...हरवला,
कंदिल आठवणीतला!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t26384/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा