शनिवार, १७ डिसेंबर, २०१६

भरलात मनी (लावणी)

भरलात मनी (लावणी)

मन आज का हरलं, का हो तुम्हावर जडलं?
सांगा सख्या तुम्ही, आक्रित कसं हे घडलं?

नव्हतं आजवर ध्यानी, न् माझ्या हि मनी
दिसलात जवा तुम्ही, भरलात माझ्या मनी
अवंदाच सोळाव सरलं, तवा तुम्हाला हेरलं
मन आज का हरलं....

वेगळाच तुमचा तोरा, नजरेत आग्रही होरा
बेभान करतो मला, रात दिन मग तो सारा
याड असं हे कसलं, तुम्ही मला हो लावलं?
मन आज का हरलं....

कसं सांगु तुम्हाला, होतयं काय ते मला?
एकदा याच तूम्ही, संगतीला मज जोडीला
करुया दोघं कमाल, बघतील लोक धमालं !
मन आज का हरलं....

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-shrungarik-kavita/t26588/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा