बुधवार, १४ डिसेंबर, २०१६

तीचं - माझं

तीचं - माझं

तीचं माझं आजकाल
बर्‍यापैकि बिनसतं,
भेटायचं ठरवूनही
भेटीचं गणित कुठे तरी चुकतं !
मग, दोष द्यायचा
तीनं मला, मी तीला,
शोधल्यावर कळतं
कारणचं नव्हत, भेट न व्हायला !
पुन्हा होतो सुरू
खेळ अबोल्याचा,
होत नाही पुढे
बट्टी साठी हात, माझा किंवा तिचा !
किती काळ चालणार?
असा हा रूसवा?
माहीत असतं दोघांना
राग हा असतो तात्पुरताच फसवा !
पुन्हा भेट होते
थोड्याच वेळापुरती,
कधी रागाने, कधी प्रेमाने
एकटक बघतच राहते मग नुसती !
मी मात्र वेड्यागत
वाट पाहतो ती बोलायची
तीच्या मनात असतं
याचीच वेळ आहे साँरी म्हणायची !
काहीच बोलत नाही
दोघ गप्पच उभे असताे,
बोलायचं कुणी आधी
हाच विचार दोघांच्या मनी असतो !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t26538/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा