जमेल तसं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जमेल तसं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २४ जून, २०२४

जमेल तसं


























जमेल तसं

निसर्ग तुमचा आमचा सगळ्यांचा आहे आणि तो जेवढा आपल्याला सांभाळून घेतो त्याच्या काही प्रमाणात आपण सुद्धा त्याला सांभाळायला हवं नाहीतर त्याचे होत असणारे परिणाम आपण पाहतच आहोत दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की आम्ही विकास, प्रगती वगैरे गोष्टीच्या नावाने ढोल बडवून वाट्टल तशी जंगलतोड करतो आणि त्या प्रमाणात दुसरी झाडे लावत नाही, थोडक्यात आपण त्याचं केलेलं नुकसान भरून काढत नाही किंवा त्याची नुकसानभरपाई करीत नाही, सभ्य भाषेत आपण असंही म्हणू शकतो की त्याचा समतोल राखायचा प्रयत्न करण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय.

आजकाल बऱ्याच संस्थांकडून भरपूर ठिकाणी वृक्षारोपण, निसर्ग संवर्धन अशी कामं चालवली जात आहेत. मला वाटतं ही गोष्ट आपण आपल्या वैयक्तिक स्तरावरून व्यापक प्रमाणात आणि परिणामकारकपणे करू शकतो, ते म्हणजे आपण जी काही फळ खातो, त्यांच्या बिया जर व्यवस्थितपणे सांभाळून त्यांचं योग्य ठिकाणी रोपण करून वाढवलं तर ती रोप आपण आपल्या आजूबाजूच्या मोकळ्या परिसरामध्ये किंवा जंगल परिसरामध्ये वाढवू शकतो. तशात काही दिवसांपूर्वी एक अशी संकल्पना समोर आली की फळांच्या बिया अशाच फेकून देण्याऐवजी त्या बियां मातीत मिसळून त्याचे गोळे म्हणजे बीज चेंडू (Seed ball) तयार करून जंगलात टाकले तर हे काम चांगल्या पद्धतीने होऊ शकेल.

त्यातूनच प्रोत्साहित होऊ काही दिवसापूर्वी जमा केलेल्या आणि उपलब्ध बियांचे ५०-६० Seed ball तयार केले व रविवार, २३ जून रोजी मी राहतो त्या परिसरातील बारवी डॅम, बदलापूर जंगलामध्ये व्यवस्थित ठिकाणी सोडून आलो किंवा इतस्त: टाकून आलो असं म्हणता येईल. गम्मत म्हणजे यावेळी माझी दिड वर्षाची नात सायेशाने देखील भारी उत्साहाने मला मदत केली, त्याअगोदर अगदी मातीचे गोळे करण्यासाठी देखील तीने चांगलीच खोडकर मदत केली. तात्पर्य काय की लहान मुलांना आपण जसं शिकू तसं ती शिकतात आणि आपलं अनुकरण करतात, मग का नको आपण त्यांना चांगल्या सवयी लावायला? मी माझ्याकडून जमेल तसा प्रयत्न केला आपणही कराल? छोटीशी मदत निसर्ग जपायला?

~शिवाजी सांगळे, बदलापूर