विडंबन कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विडंबन कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ५ जून, २०२५

गुण तुझे गाण्यासाठी

गुण तुझे गाण्यासाठी

सृष्टी सारी आनंदाने न्हाऊन जावू दे रे
गुण तुझे गाण्यासाठी मनी भाव येवू दे रे ॥ध्रु॥

शित वारे सुटते आधी मेघ सावळे येता
प्रफुल्लित होती झाडे जाणीव तुझी होता
नयनरम्य दृश्य अवघे मला दिसू दे रे ॥१॥

डोईवर पडती आधी थेंब अमृताचे  
अनोखा सुर बोलती बोल त्या सरींचे
आस्वाद त्या सुरांचा मला घेऊ दे रे ॥२॥

मध्ये मध्ये स्तब्ध होता सुरेल गाणे
सुखावून देते ओल्या उन्हाचे अवचित येणे
खेळ उन पावसाचा मला पाहू दे रे ॥३॥

एका एका थेंबाने नदी बहरताना
ओहळ नाल्यां मधूनी आधी दौडताना
लुटू पुटूची शर्यत एकदा मला पाहू दे रे ॥४॥

https://marathikavita.co.in/index.php?topic=57414.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, २८ मे, २०२५

गावात बोंब झाली

गावात बोंब झाली

एकदा तिची नि माझी ठरवून भेट झाली
झाली उगा चर्चा,अन् गावात बोंब झाली || ध्रु ||

हाटेलाच्या भजींचा वाऱ्यावर गंध सुटला
पोटात भूकेचा, तेव्हा आगडोंब उठलेला
आमंत्रण देण्याची, संधी मला मिळाली || १ ||

बोलणे फार नाही इशाऱ्यात सर्व झाले
नास्ता करून पुरता बिलही देवून झाले
नको कुणी ओळखीचे पाहिले भोवताली || २ ||

सायकलवर चुकून तीचे दप्तर ठेवलेले
शेजारच्या कुणीतरी आम्हाला पाहिलेले
गावगप्पा करायची संधी त्याने न सोडली || ३ || 

https://marathikavita.co.in/index.php?topic=57008.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, २४ मे, २०२५

व्यथा आजची

व्यथा आजची

काय काय सांगू? किती रे सांगू?
वाटते उगाच घेतली आज
मोठीच गडबड झाली आज !

कशाला नादी लागलो मी
फुकट मित्रांसोबत गेलो मी
त्या ब्रँडची, त्या व्हीस्कीची
पहिल्यांदा चव घेतली आज
मोठीच गडबड झाली आज !

तसा बुजरा, झालो धीट
पित राहिलो निट वर निट
शिकलो सवरलो असून मी
तरीही बेकार हिंडतोय आज
मोठीच गडबड झाली आज !

मुद्दाम बोलतो पिऊन मी
व्यथा आजची मांडतोय मी
नोकरी वाचून कसे जगावे
आहे का कुणाकडे काही इलाज
मोठीच गडबड झाली आज !

https://marathikavita.co.in/index.php?topic=56878.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, २३ मे, २०२५

मोबाईलच्या नेटवर्कला २३०५२०२५ yq १२:४७:०७

मोबाईलच्या नेटवर्कला

मोबाईलच्या नेटवर्कला आसुसला पोर
वायफाय द्या हो जरा, करा उपकार

योग्य वेळी बिघडलो, शौकत रमलो
हाती नाही कामधंदा, झालो बेकार

नको आता मोबाईल, नको वायफाय
वेळखाऊ खेळ सारा, उपयोगाचा नाय

स्मार्टफोनचा हल्ली होतो अतीवापर 
बंधने लावा काही, ऐका हो सरकार

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, १९ मे, २०२५

ढग आले दुरुनी

ढग आले दुरुनी

ढग आले दुरुनी, ढग आले दुरुनी
स्मरल्या का सगळ्या आठवणी?

भरधाव घोंघावणे वार्‍यांचे, आकाश सावळ्या रंगाचे
धावपळ वाढली लोकांची, नियोजनही नव्हते कोणाचे
ओढवली अशी आणीबाणी ...

नकोच आता ती अवकाळी, फक्त भरो शेतं तळी
नवजीवन मिळो धरेला, बळी घरी होवो दिवाळी
चमत्कार करावा देवा तुम्ही ...

शेतकऱ्यांचे कष्ट सरावे, शेतामधूनी पिक बहरावे
धनधान्य गृही वाढावे, गाली त्यांच्या स्मित फुलावे
देईल दान तो चक्रपाणी ...


https://marathikavita.co.in/index.php?topic=56572.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, ६ मे, २०२५

आम्ही मोबाईलच्या


एका गँजेट संगे एकरूप झालो,
आम्ही मोबाईलच्या नादी लागलो ॥धृ॥

फेसबुक इंन्स्टा एकीकडे सुरु,
ट्विटरवर देखील ध्यान ते धरु
वॉट्सअँप तर आम्ही कोळूनी प्यालो..१ 
आम्ही मोबाईलच्या....

भुक हो मोठी लाईक कमेंट्सची,
त्याच्या पुढे कसली चव जेवणाची
कामधंदे पण सारे टाळू की लागलो..२
आम्ही मोबाईलच्या....

आयफोन ज्या कडे श्रेष्ठ तो झाला,
मागास म्हणती तो की पँड वाला
उगा एकमेकां आम्ही तोलू लागलो..३ 
आम्ही मोबाईलच्या....

https://marathikavita.co.in/index.php?topic=55888.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, ९ एप्रिल, २०२५

माझा अभंग

माझा अभंग

सांगे माझा अभंग | काय चिंती मन |
नेटवर्क दे अखंड | तेव्हा लागे ध्यान ||

नारायण नारायण | जाप तिन्हीलोकी |
फेसबुक,इन्स्टा | युट्यूब आम्हा लेखी ||

भांडार ज्ञानाचे असे | जे अखंड वाहते |
कॉपी,पेस्ट,फॉरवर्ड | खेळूनी सतावते ||

पाहून काही बाही | लागे न हाती काही |
ऑबेसिटी वाढून | देह सारा विद्रूप होई ||

शिवा म्हणे आता | थोडे तुम्ही आवरावे |
"होमवर्क" करता | जरा उपलब्ध व्हावे ||


https://marathikavita.co.in/index.php?topic=54089.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०२४

गोष्ट अस्तित्वाची

गोष्ट अस्तित्वाची

सापडेना मज, स्वतःतला तु देवा हल्ली
देवळा देवळात शोधतो तुज देवा हल्ली

चेंगरून गर्दीत आणि लावीत रांगा मठी
असतो उभा फक्त,प्रदर्शनीत देवा हल्ली

कुठवर पहावी, वाट मी तुझ्या दर्शनाची
दिसशिल का रे, तु ओझरता देवा हल्ली

भक्ती किती, देखावा किती, काय सांगू?
जाणतोस तुच खरे मनातले देवा हल्ली

गोष्ट खरी सांगतो हळूच, ऐक तु एकदा
भक्तांमुळे इथे अस्तित्व तुझे देवा हल्ली

https://marathikavita.co.in/index.php?topic=47182.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, २ सप्टेंबर, २०२४

इथे अंधाराचे खेळे

इथे अंधाराचे खेळे

इथे अंधाराचे खेळे, सारे स्तब्ध होती व्यवहार
गल्ली बोळातून होई, यंत्रणेचा उध्दार उध्दार 

कामे जाती हो थांबून, राहते जनता अडून
होता सुन्न भोवताल, मनी शिव्याचेच थैमान
नको नको त्या शंकानी, उठते काहूर काहूर

वारा पाऊस थोडा येता, विज लगेच कापती
देत तीच जुनी कारणे, फोन देखील तोडती
संतापाने फुटे अंगी, घामाची नवी धार धार

घालवून नेहमी विज, येते वाढीव नवे बिल
करा निट हिशोब त्याचा, यां कोण हो सांगेल
हा कायम इकडे होतो, अजब प्रकार प्रकार

https://marathikavita.co.in/index.php?topic=45289.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९