सोमवार, २६ जानेवारी, २०२६

अति तिथे माती

अति तिथे माती

"गणपत वाणी बिडी पिताना" या बा.सी. मर्ढेकर यांच्या प्रसिद्ध कवितेवर केलेली एक विडंबन रचना.

"गणपत वाणी बिडी पिताना"
ऐकायचा नुसती मोबाईलवर गाणी!
फिरवून हात ढेरीवर म्हणायचा
गाण्यात सर्वांना मी पाजिल पाणी!

कानावरती मग हात ठेवूनि
जोर जोरात द्यायचा गड्यास हाळी!
तुही ऐकले माझे सुरेल गाणे
तर मग आता दे मला हातावर टाळी!

खुशीत येता जो गणपत वाणी 
द्यायचा गड्याला मग एखादा आना!
मळकट उशीवर बैठक मारुनी
फिरून मारायचा तानांवरती ताना!

वेड मोबाईलचे इतके वाढले
धंद्यावरुनी त्याचे सारे लक्षच उडले!
कान बहिरे, डोळे क्षीण झाले न्
धंद्यासह वाणी मात्र कायमचे बुडले!

https://marathikavita.co.in/index.php?topic=67359.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा