प्रेम सप्ताह ओव्या
पहिली माझी ओवी रे रोज डे च्या नावाने
द्यावे गुलाब पुष्प प्रेम करणाऱ्यांना प्रेमाने
दुसरी माझी ओवी रे, प्रपोज डे निमित्ताने
मागणी घालावी खुशाल, निर्लज्ज मनाने
तिसरी माझी ओवी रे,चॉकलेट च्या गोडीने
द्यावे, घ्यावे खुप चॉकलेट हावरट भावनेने
चौथी माझी ओवी रे,टेडी डे तो असल्याने
झालं प्रेम तर ठिक, नाहीतर उगा उंडारणे
पाचवी माझी ओवी रे,प्रॉमिस डे कारणाने
पाळावीत वचने!म्हटलं कुणाच्या काकाने
सहावी माझी ओवी रे, हग डे च्या अमिषने
माराव्या मिठ्या त्यांना हव्या ज्यांना चवीने
सातवी माझी ओवी रे किस डेच्या ओढीने
सार्थक होते प्रेमाचे, हळूवार किस घेण्याने
आठवी माझी ओवी रे,वैलेंटाइन स्मरणाने
होऊन गेला संत जो स्वतःच्या बलीदानाने
नववी माझी ओवी रे अनुकरण हे केल्याने
रोज वागा प्रेमाने शिकवले आपल्या धर्माने
दहावी माझी ओवी रे ज्ञानोबाच्या ओळीने
'भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे' या स्मृतीने
©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा