मला वाटते... पेरण्या पर्याय
काल पेपरात एक बातमी वाचली, "कांद्याचे भाव गडगडले, कांदा फक्त पाच पैसे किलोने विकला गेला", खरचं फार दयनिय अवस्था झाली आहे शेतकर्याची. काय करावे त्याने? हमी भाव सुध्दा मिळत नाही.
एकिकडे पिक कमी झालं तर भाव वाढीमुळे हाच कांदा सामान्यांना रडवतो, व पिक अमाप झाले तर शेतकर्याला रडवतो. कांदा मात्र आपला रडविण्याचा गुणधर्म सोडत नाही.
या नेहमीच्या अडचणीवर तज्ञ मंडळींनी शोध घेउन उत्तर शोधावे व यातुन सर्वांची सुटका करावी. मी काही शेती तज्ञ वा जाणकार नाही तरी मला सुचलेला एक उपाय मांडत आहे, बाजाराचा अंदाज घेवुन गावात विचार विनिमय करून प्रत्येकाने वेगवेगळी पीके घेवुन सामुहीक पध्दतीने शेती केली जाउ शकते, अर्थात हा उपाय किती व्यवहार्य आहे हे तज्ञ मंडळी सांगु शकतील, तर काहींना हा पर्याय पटणार देखिल नाही, तरीही सुचवावासा वाटला, वाँट्सअँप वरील एका पोस्टने प्रेरीत होउन सुचलेला हा...
"पेरण्या पर्याय"...
करोन विचार
शेत ते पेरता
शक्य होते घेता
दुजे पिक
कुणी लावा कांदे
कुणी ते टमाटे
उरल्यां बटाटे
लोवोनिया
पर्याय असता
अन्य पिका साठी
दौड का ती मोठी
कांद्या साठी
वैविध्याचा मंत्र
ठेवोनिया ध्यानी
सर्व त्या बळींनी
पिकां साठी
विचार पुर्वक
घेता समजुन
हाटा उमजुन
घ्यावे पिक
हिणवण्या कोणा
नाही ईथे डाव
कल्याण ते व्हाव
कुणब्याचं
ईश्वरा प्रार्थना
करोनी वंदन
दे भरभरून
धान्य पाणी
होईल स्वयंभु
शेतकरी राजा
विश्वास तो माझा
म्हणे शिवा
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t25155/new/#new

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा