मला वाटते...
आँलिम्पिक निमित्त
पी व्ही सिंधु व साक्षी मलिक यांनी त्याच्या क्रिडा प्रकारात अव्वल खेळ करून देशाचं व स्वतःचं नाव मोठं केलयं या साठी त्या दोघींचं व त्याच्या प्रशिक्षकांच मनःपर्वक अभिनंदन.
आज त्यांच्यावर अनेक राज्यांतुन नानाविध बक्षिसांची घोषणा आता होउ लागली आहे, हि बाब नक्कीच कौतुकास्पद आहे, त्या दोघींनी आज जगभरात भारताचे नाव मोठे केलंय, त्याच कौतुक निश्चितच व्हायला पाहीजे व ते होत आहे.
दुसरा एक विचार करता असं वाटतं कि आज जी बक्षिसं त्यांना दिली जात आहेत, तीच रक्कम जर यापुर्वी त्यांच्या चांगल्या प्रशिक्षणावर, सुविधांवर खर्च केली गेली असती तर? आज जे यश त्यांनी मिळवलं आहे त्या पेक्षा अजुन मोठं, उत्तुंग यश त्या मिळवू शकल्या असत्या, तसेच त्याच्या सारख्या अन्य खेळाडूना प्रशिक्षण घेण्यासाठी सुविधा झाली असती व आणखी नवे खेळाडू निर्माण झाले असते.
प्रत्येक राज्याने केवळ स्पर्धे उपरांत बक्षिसांची घोषणा करण्या ऐवजी होतकरू व मेहनती खेळाडूंना दत्तक घेवुन त्यांना उच्च प्रतिचं प्रशिक्षण पुरवुन जागतिक स्तरावर चमकण्याची संधी द्यायला हवी, योग्य क्रिडा धोरण अवलंबुन त्यात कोणाताही हस्तक्षेप न होउ देता सकारात्मक पणे राबवायला हवे, मग पहा किती पदकं आपल्या देशाला मिळतात ते.
मी एक सामान्य क्रिडा प्रेमी आहे कुणी क्रिडा तज्ञ वा जाणकार नाही, तेंव्हा सहज मनात विचार आला कि जर अमेरिका, चीन, ब्रिटन व अन्य पदक तालिकेतील उच्च स्थानावर असलेल्या देशातील राज्यांनी अशाप्रकारे बक्षिसे दिली तर काय होईल? मलां वाटलं त्या त्या राज्यांना इतरांकडून कर्ज घेवुन बक्षिसं द्यावी लागतील इतके विजेते खेळाडू आहेत त्याच्या कडे आहेत.
भारतिय खेळाडू खुप प्रतिभावंत आहेत, फक्त योग्य सकारात्मक पोषक क्रिडा धोरण ठरवलं व त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली कि मग पहा पुढच्या स्पर्धे वेळी आपली पदक संख्या वाढते कि नाही.
© शिवाजी सांगळे
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t25116/new/#new

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा