गंभीर कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गंभीर कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ३१ ऑक्टोबर, २०२५

मी बरा एकटा

मी बरा एकटा

म्हणावे का आता! फार काही नको? 
प्रतिस्पर्धी सोडा, सोबती? तोही नको! 

धावण्याच्या स्पर्धेत थांबा नाही कुठे
प्रवास तर सुरु झाला उगा घाई नको! 

मी बरा एकटा, होऊदे मला सर्वोच्च
त्यागी भला,भोवती कुणी मोही नको! 

प्राप्त व्हावे मला, ते सर्वश्रेष्ठ असावे
खैरात तर नाहीच,न् काहीबाही नको! 

होणार नसेल साध्य काही एकट्याने
धडपडण्यात इथे माझ्या, मीही नको!

https://marathikavita.co.in/index.php?topic=69322.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५

व्वाह रे जिंदगी

व्वाह रे जिंदगी

खुप रहस्ये घेऊन जेव्हा असते जिंदगी
मनातल्या मनामधे तेव्हा हसते जिंदगी

कमतरता नाही भोवती येथे पारंगतांची
अमिषांना त्यांच्या सहज फसते जिंदगी

होऊन करता चांगुलपणा, अंगाशी येतो
धरून डोके आपलेच मग बसते जिंदगी

धावते,थकते रात्रंदिन न् लगेच जाणवते
खिजगणतीत कुणाच्याच नसते जिंदगी

वारंवार येता वाट्याला, सुन्न हताशपणा
स्वतःलाच रे  'शिव' सतत डसते जिंदगी

https://marathikavita.co.in/index.php?topic=66467.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

सोमवार, १४ जुलै, २०२५

आहे का वेळ


आहे का वेळ

वाटे आजही मनाला
हाताळावे रोज पुस्तकाला
काहीतरी गडबड होते
आणि राहून जाते वाचायला

कधी व्यवधाने रोजची
म्हणती पाहू मग पुस्तकाला
भुरळ सोशल मीडियाची
अन् मोबाईल आडवतो मला

सांगून गेले आहे कुणीतरी
घडवते ओळ एक आयुष्याला 
तुम्हा आम्हा कळतय सारं 
पण! आहे का वेळ वाचायला?

https://marathikavita.co.in/index.php?topic=59984.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९