मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२६

आठवणी रेंगाळलेल्या






















आठवणी रेंगाळलेल्या

आंबट, काही गोड भोगलेल्या
आठवणी, ह्रदयात कोरलेल्या

तरीही हवा नकोसा एक स्वाद 
जगण्याला, या देऊन गेलेल्या

तुमच्या,माझ्या आणि सर्वांच्या
स्मरणात कायमच्या बसलेल्या

अशाच कित्येक हव्या नकोशा
विसरु म्हणता,ठाम रूतलेल्या

प्रत्येकाच्याच मनात असतात
काही "आठवणी रेंगाळलेल्या"

https://marathikavita.co.in/index.php?topic=89428.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा