शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२६

दिवाळीची सुट्टी

दिवाळीची सुट्टी

दिवाळीची सुट्टी, फटाक्यांचा ध्यास 
फराळा सोबत, दिवाळीचा अभ्यास 

सुख,समृद्धी,आरोग्याची हमी खाशी
धन्वंतरी, कुबेर पूजेची धनत्रयोदशी

छोट्या दिवाळीला नरकासुराचा वध
चिरोटे चाखतांना, मात्र रहावे सावध

अभ्यंग स्नानाने होते मग खरी पहाट
दिव्यांची आरास, नी कंदिलाचा थाट 

लक्ष्मी पुजनास होते लक्ष्मीचे स्वागत
तीच्या शिवाय का येते जगण्या गंमत

अशी ही दिवाळी, नेमाने दरवर्षी येते
सर्वांना आनंद नी उत्साह देऊन जाते

https://marathikavita.co.in/index.php?topic=95164.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९