सोमवार, १० ऑगस्ट, २०२६

कारण






















कारण

भुक मोठी, हाव मोठी
झाले जरी सर्व प्राप्त
तरीही मन का अतृप्त?

प्रश्न त्याचा, प्रश्न माझा
प्रश्न अनुत्तरित आशेचा
उत्तरातही भ्रम मनाचा!

ओढ, तळमळ जीवाची
बेगडी दौड ईथे सर्वांची
अंतिम रेषा का हक्काची?

अतृप्त मनाला सांगता
काहीच न कळे त्याला
तेच कारण नेते लयाला!

https://marathikavita.co.in/index.php?topic=89032.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा