शनिवार, ८ ऑगस्ट, २०२६

दु:ख टळले नाही























दु:ख टळले नाही

प्रयत्न करुनही कधी, दु:ख टळले नाही
आस धरूनही, सुख खरे, गवसले नाही

जीवन खेळ, सुख दुःख मिश्र भावनांचा
कळले जगता,न् सहजपणे वळले नाही

भाव कित्येक इच्छांचे, मनी या दाटलेले
भास मृगजळाचे, प्रत्यक्षात दिसले नाही

मनो-व्यापार अहोरात्र, इच्छा अकांक्षांचे
महिरपी कोंदणात, सुखनैव सजले नाही 

मोहक, फसवे, भास तृप्ततेचे देता घेता
वास्तव भोग्य जीवन सहजी सुटले नाही

https://marathikavita.co.in/index.php?topic=88796.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा