शनिवार, २२ ऑगस्ट, २०२६

अखेरचा तुम्हा दंडवत






















अखेरचा तुम्हा दंडवत

अखेरचा घ्या तुम्हा दंडवत
सोडून देतो मिडिया
ग्रुपग्रुप मधून खूप बोललो
नको आभासी दुनिया

त्यां सोबतीने उठलो बसलो
कधी फुका तोंडावर पडलो
अखेरीस रे सत्य समजलो
कळली बोगस माया

त्वरी सोडून जावे आता
कॉक्रोच ठरला विद्यार्थी आता
कुणी न त्यासी येथे त्राता
शिकू दे, पडतो पाया

https://marathikavita.co.in/index.php?topic=89394.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा