चर्चेअंती
का न व्हावे, फिरून एक आपण
ठेवूयात का जरा,दूर इगो आपण
मान्य! आवेग,वेग आहे भावनांना
घेवू त्यांना अलगद जाणून आपण
विचित्रच वाटेल, थोडा प्रश्न माझा
तरीही शोधू उत्तर, एखादे आपण
चार ऐकवं न् ऐक दोन, जमल्यास
एकमेकांचे ही थोडेसे ऐकू आपण
काय चूक आपलं, न् काय बरोबर
चर्चेअंती खरं खोटं ते ठरवू आपण
https://marathikavita.co.in/index.php?topic=90742.new#new
©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा