रविवार, २७ सप्टेंबर, २०२६

आसुसलेला





















आसुसलेला

गर्दीत हरवला माणूस माझ्यातला
शोधतोय सर्वदूर, कुणा रे गवसला 

नक्कीच इंटरनेटच्या जाळ्यात या 
असेल तो अलगदपणे गुरफटलेला 

दूर दूर क्षितिजावर एक धूसर रेषा
स्पष्ट दर्शवते भेद आम्हा दोघातला 

एक अधांतरी हो नाहीच्या चक्रात 
दूसरा घट्ट धरून मातीला बसलेला 

अपूर्ण शोध, स्वतःचा न् अनंताचा
अखंड धडपड तरीही आसुसलेला

https://marathikavita.co.in/index.php?topic=92145.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा