बुधवार, २६ ऑगस्ट, २०२६

आपलं जग २५०८२०२६ yq १६:४४:१४

आपलं जग

सगळं जग आपल वाटतं...
खरंच का हे बोलणं पटतं.? 

आभासी या स्वार्थी जगी
मोजकेच असावेत वाटतं.!

पहा शोधून,अवतीभोवती
खुल्या दृष्टीस कोण दिसतं!

एक एक दिसेल कैक रंगी
रंगाचं या,काही खरं नसतं!

प्रत्यक्षात, दिसतं ते नसतं
म्हणून अवघं जग फसतं!

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा