मावळती
शांत एकाकी मावळतीची दिशा
आपल्यातच हरवून गुंग झालेली
म्हणून थोडी हळवी, कातर सुद्धा
एकट्या जीवाला मनी भावलेली
तरल, कुठे गडद घेऊन रंग छटा
एकाकी वाऱ्यावर मंद रेंगाळलेली
होता शांत आत आत दिनकर तो
दावी नभी वेगळी नक्षी मांडलेली
हळवे जरी, अतूट नाते सांजेशी
जाणते रोज गोष्ट मनी साठलेली
उदास न् उल्हसित ती होत जाते
ऐकून अबोल साद मनामनातली
https://marathikavita.co.in/index.php?topic=45271.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा