शुक्रवार, २९ जून, २०१८

झोकतो स्वतःला

झोकतो स्वतःला

गर्दीत माणसांच्या मी शोधतो स्वतःला
एकटेपणात कधी मी हरवतो स्वतःला

ओथंबता अनेक स्वप्ने डोळ्यात जेव्हा
हट्टानेच आरसा तो सजवतो स्वतःला

कष्टास सौख्य मानता सर्व हयात गेली
वेळी सुखाच्या नेमका विसरतो स्वतःला

बहाणा भेटण्याचा तो तसा खरा होता
जोपासण्या रे हित तुझे टाळतो स्वतःला

लेखू कमी कसा सांग माझ्या निंदकांना
यशात त्यांच्या सदैव ओवाळतो स्वतःला

मौनात सागराच्या पाताळ व्यापलेले
शोधता गवसते जेव्हा झोकतो स्वतःला

© शिवाजी सांगळे 🎭
 संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30971/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा