सत्ता ग्रस
कळेना हेतू कोणता, बाळगून अंतस्थ
खेळात सत्तेच्या जो तो दिसतो स्वस्थ
गाठताच कधी मंत्रालयी त्यांचे दालनी
तेथे ही असतात नेहमी महोदय व्यस्त
चालतात नियमित दौरे, सभा, बैठका
भेटीस यांच्या, सामान्य कायमच त्रस्त
राबवता योजना अनेक लोकोपयोगी
गुपचूप होते वाटपामधून लोणी फस्त
दात वेगळे दोन्ही, दाखवायचे खायचे
म्हणून आहेत,का यांच्यातले मदमस्त
पक्षा करता सांभाळता, स्वार्थ सर्वथा
सोड जनहित,नित्य राजकारणी ग्रस्त
विडंबन कविता, Jun 02, 2026 YQ 03:00:15 PM
©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा