गुरुवार, २५ जून, २०२६

शुष्क अश्रू

शुष्क अश्रू

आगमन मुळी इहलोकी, टँहच्या सुराने
पाचवीलाच पुजली जाती अनेक रुदने

स्मरूनही शाळेतल्या, आर्त बाल हाका 
तरीही ना सुटले एका तपाचे जाणे येणे

तारुण्यातही ना, तुटले पाश विलापाचे
घरी दारी कधी पोळले गेले हात वेदनेने

ओढ लागता मनाला,जीव हताश होतो
भरून जातो उर तेव्हा, मुक आक्रोशाने

सर्वत्र असते दु:ख, निराळे वार्धक्यातले
कुरवाळत गत स्मृतींना मुक्यानेच रडणे

थांबावी वाटते एकाएकी ही रुदन यात्रा
अन् दाबून वेदनांना, शुष्क अश्रू ढाळणे

https://marathikavita.co.in/index.php?topic=84535.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा