शुक्रवार, ५ जून, २०२६

ठहराव

ठहराव

"व्यक्ती तितक्या प्रकृती"
म्हटलेच आहे बरोबर कुणी
भेटतात काही लोक असे
म्हणून पटते म्हण हि जुनी

असून विदीर्ण खोल आत
दर्शवती काही सुखी वर वर
जगतात तरी ही आनंदाने
ठेवून दगड स्वतः ह्रदयावर

म्हणो स्टाईल,पध्दत कुणी
वेगळी शैली इथे जगण्याची
मस्तीत फक्त जगणं ठावूक
कशाला पर्वा, तमा कुणाची

पहायचा,जगायचा असतो
क्षण क्षण आनंदी भोवतीचा
कुणास ठावूक येईल कधी
                                                                                                    अचानक ठहराव स्तब्धतेचा
https://marathikavita.co.in/index.php?topic=82893.new#new
©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा