मंगळवार, २६ मे, २०२६

संघर्ष चर्चा























संघर्ष चर्चा

रोजचा संघर्ष माझा का कुणास सांगू नये  
होईल नाराजी, म्हणून का व्यक्त होवू नये

असूनही भरमसाठ,योजना न् प्रश्न समोरी 
अंमलबजावणीस त्यां फुका वेळ दौडू नये

बदलला साराच ढाचा व्यवस्थेचा येथल्या 
लठ्ठ सत्तेपुढे कैफियत का कुणी मांडू नये 

पावलागणिक मागण्या, कामे मंजुरीसाठी 
वाढलेल्या भ्रष्टाचाराची,चर्चा का करु नये

ठेवावी मनी लाज जरा जनाची वा मनाची 
द्यावे लागते उत्तर शेवटी, सत्य विसरु नये 

https://marathikavita.co.in/index.php?topic=81887.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा