शुक्रवार, २२ मे, २०२६

परीक्षा जिद्दीची

परीक्षा जिद्दीची

वाटते आहे अवघड वाटचाल जगण्याची
खरी अविभाज्य अहमहमिका जीवनाची 

खडतर जरी मार्ग, पावलोपावली इथला
लढायचीच आहे येथे लढाई अस्तित्वाची

थकू नको हारु नको,माघार मुळीच नको 
ठेवून ध्येय मनी सोड निशाणी पावलांची 

कोणतीच वाट नाही सहजसाध्य जाण तू 
क्षणोक्षणी घेतलीच जाते परीक्षा जिद्दीची 

आठवतो मंत्र पुरातन 'थांबला तो संपला'
विसरून त्या, लिही कहाणी जिंकल्याची

https://marathikavita.co.in/index.php?topic=81573.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा