मंगळवार, १९ सप्टेंबर, २०२३

सत्य शोध

सत्य शोध


ठरवून परस्पर घरदार जन्म येथे घेतो का कोणी 

कोण आपले, गैर कोण मुळी जाणतो का कोणी


कुणी जोडले नाते किनाऱ्याचे असे येथे लाटांशी

काय म्हणणे सागराचे त्यास विचारतो का कोणी


सारेच अंदाज आमचे येथले दरवळांवर बेतलेले

खाद्य स्वादा पलीकडले, दूजे चाखतो का कोणी


पुरेल कुठवर थिगळ रफु विरल्या वस्त्र नात्यांना

येते ढीलाई सुतास कातल्या आठवतो का कोणी


खरे खोटे, निती अनितीच्या, झाडतो स्वैर गप्पा

विधिनिषेध तयांचे वास्तवात पाळतो का कोणी


अल्प होते मिलन तिमिर प्रकाशाचे फक्त दोनदा

शोध सत्य 'शिव' जन्ममृत्यूचे जाणतो का कोणी

https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t44623/new/#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon

 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा