रविवार, १९ एप्रिल, २०२६

ढगांची नक्षी























ढगांची नक्षी

प्रदूषण आणि भोवताली
ईमारतींच्या गराड्यात,
मोकळे ढाकळे आभाळ
दिसते कुठे हल्ली शहरात?

आज सवड मिळाली
आणि शहरा बाहेर गेलो,
ऑक्सिजन तर मिळाला
बऱ्यापैकी ढग पाहून आलो!

दाटून आलेले अनेक ढग
होते घेऊन वैविध्यपूर्ण नक्षी,
वेगवेगळ्या विचारांची, जणू
सतत बदलणारी माणसं जशी!

कोण खरं? कोण खोट?
बहूदा त्यांनाही माहीत नसावं,
कुठे कधी आणि कसं!
उगाच का, अवकाळी बरसावं?

https://marathikavita.co.in/index.php?topic=79207.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा