शुक्रवार, ३ एप्रिल, २०२६

शब्द गारुड ०३०४०२६ yq १०:१७:१७























शब्द गारुड 

काहीतरी लिहायचं आहे आज मनात साठलेलं 
झाड होईल मन, जसं पानगळ होऊन वठलेलं!

निचरा होईल भावनांचा, नी पालवी नवी फुटेल 
चमकतील भाव,जणू कोवळं पान लुसलुसलेलं 

वाहते नादात आगळे अबोल ऋतूचक्र अविरत
होऊन एकरूप ते, मनामनाशी अतुट जुळलेलं!

एक एक छटा घेऊन, सोबतीला सप्तरंगी वर्ख 
भासे शब्दशिल्प एकमेकात सहजपणे रंगलेलं!

भावना उतरतात हळूवार, उमटतात कागदावर
करती गारुड मनावर, जणू पिसं एक लागलेलं!

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा