हातोडा
पावसाचा जोर, थोडासा काय वाढतो
कनेक्टींग लिंकचा, स्लँबच कोसळतो
पुलांची पण आता, सुरू झाली स्पर्धा
कुठे कोसळतोय अख्खा न् कुठे अर्धा
दोष भुकंपाला देई कुणी एक ठेकेदार
उद्घाटने नी फोडाफोडीत दंग सरकार
अँक्ट ऑफ गॉड की नैसर्गिक आपत्ती
काहीही असो,आहे जनतेचीच संपत्ती
टक्केवारी,हिश्यांचा मोह आता सोडा
त्रासलेल्या जनतेकडून पडेल हातोडा
https://marathikavita.co.in/index.php?topic=85780.new#new
©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा